IndiaNewsUpdate : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग एम्समध्ये दाखल

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे वृत्त आहे. एम्समधील कार्डियो टॉवरमध्ये डॉ. नितीश नायक आणि त्यांच्या टीमच्या निरीक्षणाखाली मनमोहन सिंग यांना ठेवण्यात आले आहे. उपलब्ध माहितीनुसार, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना ताप आल्यानंतर एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना ताप आला होता, आणि आज डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
२००४ ते २०१४ पर्यंत पंतप्रधान राहिलेले मनमोहन सिंग यांना या वर्षी कोरोनाची लागण झाली आहे. ते १९ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आले होते . त्यानंतर त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते . यानंतर २९ एप्रिल रोजी त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. मनमोहन सिंग यांनी ४ मार्च आणि ३ एप्रिल रोजी कोरोनाच्या दोन्ही लशी घेतल्या होत्या.
Former Prime Minister Dr. Manmohan Singh admitted to All India Institute of Medical Sciences, Delhi
(file photo) pic.twitter.com/SAm5NOpeiF
— ANI (@ANI) October 13, 2021
संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त एएनआयने दिले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. या वर्षी एप्रिल महिन्यात मनमोहन सिंग यांना करोनाची लागण झाल्यानंतर त्यांना एम्समध्येच दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना करोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती. मनमोहन सिंग करोनावर मात करून घरी देखील परतले होते. ते ८९ वर्षांचे आहेत.