UttrarPradeshNewsUpdate : अखेर राहुल गांधी आणि प्रियांका लख्मीपुरात पोहोचले

लखीमपूर : अखेर दिवसभराच्या संघर्षानंतर अखेर काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी लखमीपूर येथे मृत पावलेल्या शेतकऱ्याच्या घरी पोहोचले आहे. लवप्रीत यांच्या कुटुंबातील सदस्यांची गळाभेट घेऊन राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी त्यांचे सांत्वन केले. लखीमपूरमधील पलिया येथील मृत पावलेले शेतकरी लवप्रीत यांच्या घरी गांधी आणि प्रियंका गांधी एकत्र पोहोचले. स्वतः ट्विट करून राहुल गांधी यांनी हि माहिती देऊन हा सत्याग्रह चालूच राहील असे म्हटले आहे.
शहीद लवप्रीत के परिवार से मिलकर दुख बाँटा लेकिन जब तक न्याय नहीं मिलेगा, तब तक ये सत्याग्रह चलता रहेगा।
तुम्हारा बलिदान भूलेंगे नहीं, लवप्रीत।#लखीमपुर_खीरी pic.twitter.com/TklEi7e5Ok
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 6, 2021
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांचीही यावेळी उपस्थिती होती. जवळपास अर्धा तास राहुल आणि प्रियांका गांधी मृत कुटुंबीयांसोबत होते. यावेळी त्यांनी लवप्रीत कुटुंबीयांचं सांत्वन करत धीर दिला. तसेच, या लढाईमध्ये आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे आश्वासनही राहुल गांधींनी दिले.
दरम्यान उत्तरप्रदेशमध्ये जाण्यापूर्वी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की काही काळापासून भारतातील शेतकऱ्यांवर सरकारकडून हल्ले होत आहेत, शेतकऱ्यांना जीपने चिरडले जात आहे, त्यांचा खून केला जात आहे. ते पुढे म्हणाले की, ‘भाजपच्या गृहमंत्र्यांविषयी याठिकाणी बोललं जात आहे, त्यांच्या मुलाविषयी बोललं जात आहे मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही आहे.
"सत्ता के गुमान में उड़ने वाले जमीन के इस दर्द को नहीं समझ पाएंगे।"
कांग्रेस पार्टी, @RahulGandhi जी, @priyankagandhi जी न्याय के सिपाही हैं।
उनकी कोशिश थी- न्याय की मशाल बुझाने की।
हमारी कोशिश है- हर पीड़ा में एक नई उम्मीद जगाने की।।#NyayHokarRahega pic.twitter.com/YeDKThfQM6— Congress (@INCIndia) October 6, 2021
‘दुसरीकडे शेतकऱ्यांवर पद्धतशीरपणे आक्रमण होत आहे आणि त्यामुळेच शेतकरी दिल्लीबाहेर बसले आहेत. त्याची सुरुवात भूसंपादन विधेयकापासून झाली, त्यानंतर तीन कृषी कायदे मंजूर झाले. आता पद्धतशीर जे शेतकऱ्यांचं आहे ते ओरबाडून घेतले जात आहे आणि ही चोरी सर्वांसमोर होत आहे’, अशी प्रतिक्रिया यावेळी राहुल गांधी यांनी दिली. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रसार माध्यमांनाही फटकारले . विविध प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान लखनऊमध्ये होते पण ते लखीमपूर खेरीला भेट देऊ शकले नाहीत अशा शब्दात राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका केली तर सरकारला प्रश्न विचारण्याऐवजी मध्ये विरोधी पक्षांना प्रश्न विचारतात असेही राहुल गांधी म्हणाले.