IndiaNewsUpdate : परवानगी नसतानाही काँग्रेसनेते राहुल गांधी लखीमपूर खेरीच्या मार्गावर…

नवी दिल्ली : प्रियांका गांधी आणि इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांना उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीला जाण्यापासून परावृत्त केलेले असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही उत्तर प्रदेश राज्य सरकारने परवानगी नाकारल्या नंतरही ते लखीमपूर खेरीला जाण्यासाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. रविवारी लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हिंसाचार झाल्यानंतर पीडितांची भेट घेण्यासाठी गेलेल्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली होती. तसेच छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पंजाबच्या उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांना लखीमपूर खेरीमध्ये जाण्यास योगी रोखण्यात आले होते.
काँग्रेसने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लखीमपूर खेरी संदर्भात एक पत्र लिहून त्यात म्हटले होते की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय शिष्टमंडळाने जिल्हा दौऱ्याची योजना आखली आहे. तसेच प्रियंका गांधी यांची अटक कोणत्याही कारणाशिवाय असल्याचेही म्हटले होते . राहुल गांधी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, पक्षाचे नेते केसी वेणुगोपाल आणि राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचे शिष्टमंडळ दुपारी दीडच्या सुमारास राज्याची राजधानी लखनऊला पोहोचणार आहे. राज्य सरकारने मोठ्या संमेलनांवर बंदी घालण्याच्या आदेशांचा हवाला देऊन लगेचच भेटीची परवानगी नाकारण्यात आली, अशी माहिती एएनआयने दिली आहे.
राहुल गांधी यांची पत्रकार परिषद
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचाराचे पडसाद मंगळवारीही उमटले आहेत. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाला लक्ष्य करत विरोधकांनी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या पुत्राला अटक करण्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे, सोमवारी पहाटेपासून स्थानबद्ध करण्यात आलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यासह ११ जणांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली. ही कारवाई बेकायदा असून, ३८ तासांनंतरही आपल्याला संबंधित कागदपत्रे, नोटीस देण्यात आलेली नाही, असे प्रियंका यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे पाचसदस्यीय शिष्टमंडळ आज लखीमपूरला भेट देणार आहे. मात्र उत्तर प्रदेश सरकारने राहुल गांधी आणि शिष्टमंडळाला परवानगी नाकारली आहे. त्यावर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केले आणि आपली भूमिका मांडली. प्रियंका गांधींवर केलेल्या कारवाईबाबत देखील राहुल गांधी यांनी भाष्य केले आहे. उत्तर प्रदेश सरकारने प्रियंका गांधींना रोखले असले तरी ही शेतकऱ्यांची बाब आहे देशाच्या राज्यघटनेवर भाजपा आणि आरएसएसने नियंत्रण मिळवलं आहे. जी लोकशाही इथे होती तिथे आता इथे हुकूमशाही आहे. राजकारणी उत्तर प्रदेश मध्ये जाऊ शकत नाही. छत्तीसगडचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांना भेटायला जातात तेव्हा त्यांना अडवले जाते. भारतीयांचा आवाज दाबला जात आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.