CoronaAurangabadUpdate : औरंगाबाद जिल्ह्यात 34 नवे रुग्ण , 144 सक्रिय रुग्ण

जिल्ह्यात एक लक्ष 44 हजार 966 कोरोनामुक्त, 144 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 19 जणांना (मनपा 04, ग्रामीण 15) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 44 हजार 966 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 34 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 48 हजार 681 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 571 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 144 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मनपा (20)
शहा नगर 1, शहा बाजार 1, एमजीएम हॉस्पीटल 1, बीड बायपास 3, आईसाहेब चौक 1, सिडको परिसर 1, पिसादेवी 1, कांचनवाडी 1, हर्सुल परिसर 2, भगतसिंग नगर 1, अन्य 7
ग्रामीण (14)
औरंगाबाद 2, गंगापूर 6, वैजापूर 3, पैठण 3