CongressNewsUpdate : अखेर कन्हैया कुमार आणि आमदार जिग्नेश मेवानी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : सीपीआय नेते कन्हैया कुमार आणि गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांनी आज भगतसिंग यांच्या जयंतीच्या दिवशी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी, राहुल गांधी यांच्यासह दोन्ही नेते दिल्लीतील आयटीओ, शहीदी पार्क येथे पोहोचले. येथे तिन्ही नेत्यांनी भगतसिंग यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला. यावेळी गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल देखील उपस्थित होते.त्यानंतर या दोघांनीही काँग्रेस नेते राहुल गांधी आणि केसी वेणूगोपाल यांच्या उपस्थितीत आपला पक्ष प्रवेश केला.
दरम्यान कन्हैया कुमार आणि जग्नेश मेवाणी हे दोन्ही नेते देशातील हिटलरशाही धोरण राबवणाऱ्या मोदी सरकारविरोधात गेल्या ७ वर्षांपासून आवाज उठवत आहेत. कन्हय्या कुमार हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रतीक आहे, असे काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल म्हणाले.
I am joining Congress because it's not just a party, it's an idea. It's country's oldest and most democratic party, and I am emphasising on 'democratic'…Not just me many think that country can't survive without Congress…: Ex- CPI leader Kanhaiya Kumar after joining Congress pic.twitter.com/gepPryBGBN
— ANI (@ANI) September 28, 2021
कन्हैयाकुमार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कठोर शब्दात टीका केली. कन्हैयाकुमार म्हणाले कि , आम्ही देशातील सर्वांत जुन्या लोकशाही पक्षात प्रवेश केला आहे. कारण काँग्रेस वाचली नाही तर देश टिकणार नाही, असे या देशातील लाखो आणि कोट्यवधी नागरिकांना वाटते. विरोधी पक्ष कमकुवत झाल्यावर सत्ताधाऱ्यांची वाटचाल ही हुकूमशाहीच्या दिशेने होते. लोकसभेतील जवळपास २०० जागा अशा आहेत, जिथे भाजपसमोर काँग्रेसशिवाय कुठलाही पर्याय नाही. यामुळे देशातील सर्वात मोठ्या आणि जुन्या पक्षाला वाचवले गेले नाही. मोठ्या जहाजाला बुडण्यापासून वाचवले गेले नाही, तर छोट्या होड्यांचा आणि नावांचा काहीही उपयोग होणार नाही, अशी भूमिकाही कन्हैयाकुमार यांनी मांडली.
CPI leader Kanhaiya Kumar and Gujarat MLA Jignesh Mewani joins Congress in the presence of Rahul Gandhi in New Delhi pic.twitter.com/7t0tf8lqmp
— ANI (@ANI) September 28, 2021
तसेच देशात जो वैचारिक संघर्ष सुरू आहे, त्याचे नेतृत्व फक्त काँग्रेसच करू शकते. भिंतीवर बसून बघण्याची ही वेळ नाही. काँग्रेस पक्ष हे एक मोठे जहाज आहे, जर काँग्रेस पक्ष जिवंत राहिला तर लाखो आणि कोट्यवधी तरुणांच्या आकांक्षा वाचतील, भगतसिंगांचा भारत वाचेल. याच आशेने आणि उमेदीने आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचेही कन्हैयाकुमार म्हणाले.
दरम्यान काँग्रेसमध्ये कन्हैया आणि जिग्नेशची भूमिका काय असेल याबाबत चित्र स्पष्ट नाही. तरुणांना काँग्रेसशी जोडण्यासाठी आणि केंद्रातील मोदी सरकार विरोधात आंदोलनांसाठी हे दोन्ही नेते एक मोहीम सुरू करतील अशी शक्यता आहे. बिहारमध्ये कन्हैयाकुमार आणि गुजरातमध्ये जिग्नेश मेवाणी यांना काँग्रेसकडून मोठी पदे दिली जातील असे म्हटले जात आहे.
बऱ्याच काळापासून काँग्रेस नेतृत्वाच्या संपर्कात होते.
#WATCH | CPI leader Kanhaiya Kumar and Gujarat MLA Jignesh Mewani meet Congress leader Rahul Gandhi at Shaheed-E-Azam Bhagat Singh Park, ITO, Delhi pic.twitter.com/gMhDJpbGH9
— ANI (@ANI) September 28, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी बऱ्याच काळापासून काँग्रेस नेतृत्वाच्या संपर्कात होते. अलीकडेच कन्हैया कुमारने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. उत्तर गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील वडगाम मतदारसंघातून उमेदवार न उभा करून काँग्रेसने गेल्या विधानसभा निवडणुकीत जिग्नेशला मदत केली होती. तर काँग्रेसच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कन्हैया कुमारला काँग्रेसच्या जवळ आणण्यात आमदार शकील अहमद खान यांनी सर्वात मोठी भूमिका बजावली आहे. कन्हैयाशी त्यांचा चांगला संबंध आहे आणि त्यांनीच कन्हैया कुमारची राहुल गांधींशी भेट घालून दिली. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) च्या विरोधातील आंदोलनात शकील बिहारमध्ये कन्हैयासोबत फिरत होते.