MaharashtraRainUpdate : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आणखी ४ दिवस जोरदार पाऊस

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची संततधार चालूच असून आज आणि उद्या म्हणजेच येत्या ४८ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. २४ आणि २५ तारखेपर्यंत बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे पाऊस पडत राहणार आहे, अशी माहिती मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्राचा पुढील ५ दिवसांसाठी जिल्हा निहाय पूर्वानुमान :https://t.co/JYmdPo98tJ pic.twitter.com/xWzj1BBtA3
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 22, 2021
दरम्यान राज्यात येत्या २५ तारखेपर्यंत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आजही मुंबईसह रायगड, रत्नागिरी आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच आज आणि उद्या सांगली, भंडारा, गोंदिया, गडचिरोली हे जिल्हे वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही वीजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हे चार जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. २५ तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा तर कोकण विभागासह मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.