PuneNewsUpdate : पुण्यात एक दिवसाचा बंद , मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया

पुणे : रविवारी होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या दिवशी पुण्यात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन या दिवशी पुणे आणि आसपासच्या परिसरात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बंदमुळे पुण्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेववावेत असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी निर्बंध अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना परिस्थितीच्या संदर्भातील आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत अजित पवारांनी ही माहिती दिली.पुण्यातील कोरोबाधित रुग्णांची वाढ आणि मृत्युदर कमी झाला असला तरी परिस्थिती अशीच राहिली तर २ ऑक्टोबर ला नवा निर्णय घेऊ असंही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मनात काय हे मी कस सांगू?
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावी सहकारी म्हणत केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात पत्रकार परिषदेला संबोधित करताना अजित पवार म्हणाले, ते राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी काय बोलावं हे मी कसं ठरवणार? मुख्यमंत्र्यांच्या मनात काय हे मी कस सांगू? माझ्याशी बोलताना तर सरकारचे निर्णय, काय कसे चालवायचे , समस्या काय याच्याच चर्चा होतात. आज पूर्णपणे बहुमत महविकास आघाडीकडे आहे. आमचं मस्त चाललंय, महाविकास आघाडी सरकारचा कारभार व्यवस्थितीत सुरू आहे.