CoronaMaharashtraNewsUpdate : आजही राज्यासाठी दिलासादायक बातमी , रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०६ टक्के

मुंबई : महाराष्ट्रासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजही दिलासादायक बातमी आहे आणि हि बातमी म्हणजे गेल्या काही दिवसांपासून राज्यात नव्या बाधित रुग्णांची संख्या ४ हजारांहून कमी आढळत असल्याचे चित्र असून आजही राज्यात ३,५९५ नवीन रुग्णांचं निदान झाले आहे.
राज्यात आज ३,२४० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,२०,३१० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०६ टक्के एवढं झाले आहे.सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. राज्यात आज ४५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,६५,२९,८८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,११,५२५(११.५२टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,८९,४२५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर १,९०८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.