CoronaMaharashtraUpdate : राज्यात ३, ५३० नव्या रुग्णांची नोंद , ५२ रुग्णांचा मृत्यू

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात ३ हजार ५३० इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या २ हजार ७४० इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ३ हजार ६८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ३ हजार २३३ इतकी होती. तर, आज ५२ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या २७ इतकी होती.
राज्यात कालच्या तुलनेत आज करोना बाधितांच्यादैनंदिन रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. शिवाय मृत्यूची संख्याही वाढली आहे. असून कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या देखील थोडी कमी असल्याने आजची स्थिती तुलनेने दिलासादायक आहे.
आज राज्यात झालेल्या ५२ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख १२ हजार ७०६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०६ टक्के इतके झाले आहे.
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ६२ लाख २५ हजार ३०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ०४ हजार १४७ (११.५७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९६ हजार १७६ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १ हजार ८७५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.