MarathwadaNewsUpdate : वंचित बहुजन आघाडीच्या “या” नेत्याचाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित

उस्मानाबाद : प्रसिद्ध लावणी साम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाची बातमी आल्यानंतर उस्मानाबाद येथील वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि मल्हार आर्मीचे प्रमुख आणि सुरेश कांबळे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे घोषित केले आहे. येत्या १६ तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
सुरेश कांबळे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून भुम परंडा वाशी मतदार संघात तानाजी सावंत आणि राहुल मोठे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.काल भूममध्ये कार्यकर्ता मेळावा घेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. याशिवाय साताऱ्यात भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनीही भाजपला सोडचिट्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शशिकांत वाईकर हे शिवेंद्रराजेंचे कट्टर समर्थक मानले जातात. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे , दीपक पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्षप्रवेश केला आहे.