Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiCrimeUpdate : साकीनाका प्रकरणानंतर मुबंईत पुन्हा एका अल्पवायून मुलीवर बलात्कार

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : मुंबईच्या साकीनाका येथील बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच शिर्डीहून मुबंईत आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर उल्हासनगर स्टेशन परिसरातून नेऊन बलात्कार करण्याची घटना घडली आहे . रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आरोपीने गुन्हा काबुल केला आहे.

Advertisements

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि , उल्हासनगर स्थानकास लागून असलेल्या स्कायवॉकवर ही पीडित अल्पवयीन मुलगी उभी होती. ही मुलगी शिर्डीहून कल्याण येथे एका खासगी बसने आली होती. स्कायवॉकवर तिला तिचेदोन मित्र भेटले. त्यावेळी एक तरुण त्यांच्या जवळ आला. त्याच्या हातात हातोडा होता. या हातोड्याचा वापर करत त्याने तिच्या मित्रांना धमकावले. त्यानंतर ते मित्र पळून गेले. त्यानंतर त्या तरुणाने तिला जबरदस्ती एका निर्जन स्थळी नेले. त्या ठिकाणी त्याने मुलीला बेदम मारहाण केली. नंतर तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर आरोपी मुलीला घटनास्थळी तसेच सोडले आणि तो पळून गेला.

Advertisements
Advertisements

घटना घडल्यानंतर ही मुलगी पहाटेपर्यंत त्या पडक्या घरातच होती. त्यानंतर तिने पुन्हा आपल्या मित्रांना फोन केला आणि आपल्यावर बलात्कार झाल्याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक वाल्मीक शार्दुल यांनी या घटनेचा तपास सुरु झाला. पोलिसांनी या प्रकरणी पॉस्कोखाली गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी दादा उर्फ श्रीकांत गायकवाड याला अटक केली. गायकवाडने आपला गुन्हा कबूल केला आहे.


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!