IndiaNewsUpdate : ऐकावे ते नवलंच !! कोणी काहीही म्हणा , पण “त्याने ” देवाला वाहिलेला नारळ तब्बल साडे सहा लाखाला घेतला !!

बागलकोट : कर्नाटकाच्या बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी येथील चिक्कालकी गावातील एका १२ व्य शतकातील मलिंगराय मंदिरातील नारळ एका भाविकाने तब्बल ६.५ लाखाची बोली लावत खरेदी करण्याचा निर्णय घेतला. नारळ विकत घेणारा व्यक्ती विजयपुरा जिल्ह्यातील टिक्कोटा गावातील फळविक्रेता आहे. मिळालेल्या या रकमेचा वापर मंदिराच्या विकासासाठी आणि इतर धार्मिक कामासांसाठी केला जाणार असल्याचं मंदीर समितीचे सचिव बासू काडली यांनी सांगितले.
दरम्यान बोली लावलेल्या महावीर हारके या फळविक्रेत्याने म्हटले , की भलेही लोक मला वेडा म्हणू किंवा याला अंधश्रद्धा म्हणो. मात्र, माझ्यासाठी ही भक्ती आणि विश्वास होता. जेव्हा मी आर्थिक आणि आरोग्यविषयक अडचणींचा सामना करत होतो, तेव्हा त्यांनी देवाकडे प्रार्थना केली होती आणि काही महिन्यांतच सगले काही बदलून गेले. आपण हा नारळ आपल्या घरी ठेवणार असून रोज त्याची पूजा करणार आहोत.
या घटनेची अधिक माहिती अशी कि, श्री बीलिंगेश्वल यात्रेत श्रावण महिन्यातील शेवटच्या दिवशी मंदीर समितीतर्फे नारळाचा लिलाव करण्यात आला. यात अनेकांनी भाग घेतली. मात्र, कोणीही या फळ विक्रेत्याने लावलेल्या बोलीच्या आसपासही गेले नाही. भगवान मलिंगराय म्हणजे शिवच्या नंदीचे रूप मानले जाते. त्यामुळे, त्यांच्याजवळ ठेवलेला नारळ त्यांच्या भक्तांसाठी सर्वात खास असतो. हा नारळ खरेदी करण्याचे भाग्य उजळते अशी भाविकांची श्रद्धा आहे असे मंदिराचे सचिव बासू काडली यांनी सांगितले.
बासू काडली पुढे म्हणाले कि , मंदीर समिती बऱ्याच काळापासून या नारळाचा लिलाव करते. मात्र, यासाठी कधीही १०,१०० हून अधिकची बोली लागली नाही. मात्र, यंदा ही परिस्थिती भरपूर बदलली. बोली १००० रुपयांपासून सुरू झाली, लवकरच हाआकडा एक लाखाच्या पार गेला. यानंतर एका भक्ताने तीन लाखाची बोली लावली. मंदीर समितीच्या सदस्यांनी लगेचच ही अंतिम बोली ठरवत लिलाव संपवण्याचा निर्णय घेतला, कारण नारळासाठी याआधी कधीही इतकी बोली लागली नव्हती. मात्र, अखेर महावीर हारके या फळविक्रेत्याने दुप्पट रक्कम देत हा नारळ ६.५ लाखाला खरेदी केला. द टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.