CoronaIndiaUpdate : कोरोना एक नजर : जाणून घ्या आजची देशातील कोरोनाची स्थिती

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 28,591
देशात 24 तासात डिस्चार्ज – 34,848
देशात 24 तासात मृत्यू – 338
एकूण रूग्ण – 3,32,36,921
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 3,84,921
एकूण डिस्चार्ज (रिकव्हरी) – 3,24,09,345
एकूण मृत्यू – 4,42,655
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 73,82,07,378
गेल्या 24 तासातील लसीकरण – 72,86,883
India reports 28,591 new #COVID19 cases, 34,848 recoveries, and 338 deaths in last 24 hours, as per Health Ministry.
Total cases: 3,32,36,921
Active cases: 3,84,921
Total recoveries: 3,24,09,345
Death toll: 4,42,655Total vaccination: 73,82,07,378 (72,86,883 in last 24 hours) pic.twitter.com/6JoT6wJkPC
— ANI (@ANI) September 12, 2021
नवी दिल्ली : गेल्या 24 तासात देशात 28 हजार 591 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद असून आठवडाभरातील आकडेवारीनुसार कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ उत्तर होत असल्याचे आढळून येत आहे. कालच्या नोंदीनुसार 338 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर कालच्या दिवसात देशात 34 हजार 848 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 73 कोटी 82 लाख 7 हजार 378 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
दरम्यान भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 32 लाख 36 हजार 921 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 24 लाख 9 हजार 345 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 42 हजार 655 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 84 हजार 921 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. 28 हजार 591 नवीन कोरोनाग्रस्तांपैकी एकट्या केरळमध्ये काल 20 हजार 487 रुग्ण सापडले, तर 338 कोरोना बळींपैकी केरळात 181 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
अशी असेल कोरोनाची तिसरी लाट
देशात दुसरी लाट चालू असताना संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्यात येत असून आतापर्यंत देशातील 73 कोटी 82 लाख 7 हजार 378 लोकांचे लसीकरण झाले आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान येणार असली तरी अभ्यासकांच्या मतानुसार या लाटेची तीव्रता दुसऱ्या लाटेपेक्षा खूपच कमी असेल असे सांगण्यात येत आहे. याबाबत आयआयटी-कानपूरचे शास्त्रज्ञ मनींद्र अग्रवाल म्हणाले की, जर कोरोना विषाणूचे नवे स्वरूप आले नाही तर परिस्थिती बदलण्याची शक्यता नाही. अग्रवाल हे तज्ज्ञांच्या तीन सदस्यीय पथकाचे सदस्य आहेत. या पथकाकडे कोरोनाच्या संसर्गवाढीचा अंदाज लावण्याचे काम देण्यात आले आहे. देशात जर कोरोनाची तिसरी लाट आली तर दररोज एक लाख नवे रुग्ण नोंदवले जातील. मे महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला होता. त्यावेळी दररोज चार लाख नव्या रुग्णांची नोंद होत होती. दुसऱ्या लाटेत हजारो लोक मरण पावले तसेच कित्येक लाख कोरोना विषाणूने संक्रमित झाले होते या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाकडून तयारी केली जात आहे.