CoronaMaharashtraUpdate : राज्यात २४ तासात आढळले ३ हजार ७५ रुग्ण , ३ हजार ५६ रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई : गेल्या २४ तासात राज्यात ३ हजार ७५ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या आज नोंदवली गेली आहे. दुसरीकडे ३ हजार ५६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६३ लाख २ हजार ८१६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्के इतके झाले आहे. राज्यात दिवसभरात ३५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा २.१२ टक्के इतका आहे. राज्यात आता ४९ हजार ७९६ रुग्ण सक्रीय आहेत.
दरम्यान राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ५८ लाख ३६ हजार १०७ रुग्णांपैकी ६४ लाख ९४ हजार २५४ जणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण हे ११.६३ टक्के इतके आहे. सध्या राज्यात २ लाख ९५ हजार ७७२ रुग्ण होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर १,९५४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
देशात ३३ हजार ३७६ नव्या करोनाबाधितांची नोंद
देशात गेल्या २४ तासांमध्ये देशात ३३ हजार ३७६ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या तीन लाख ९१ हजार ५१६ झाली आहे. तर काल दिवसभरात ३२ हजार १९८ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता तीन कोटी २३ लाख ७४ हजार ४९७ वर पोहोचली आहे. देशातला रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७.४९ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर गेल्या ७८ दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचा साप्ताहिक दर सातत्याने तीन टक्क्यांच्या खालीच आहे.
देशात सर्वत्र लसीकरणाचा वेग वाढला
केंद्र सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि हरयाणात सर्वाधिक लसीकरण होत आहे. देशात आतापर्यंत सहा लसींना परवानगी देण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुटनिक व्ही, अमेरिकेची मॉडर्ना आणि जॉन्सन जॉन्सनच्या सिंगल डोस आणि झायडस कॅडिलाच्या तीन डोस असलेल्या ‘झायकोव्ह-डी’ या लसींना परवानगी दिली आहे. यामुळे देशात लसीकरण मोहीम वेगाने राबवली जात आहे. शहरी भागांसह ग्रामीण भागातही लसीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. जगभरातल्या अनेक देशांपेक्षा राज्यातला लसीकरणाचा वेग अधिक असल्याचे दिसत आहे.