Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्याचा कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत विक्रम

Spread the love

मुंबई : राज्यात आजपर्यंत एकूण 6 कोटी 55 लाख 20 हजार 560 लसींचे डोस देण्यात आलेत. त्यात सर्वाधिक 1 कोटी 79 लाख 78 हजरा 805 नागरिकांना लसीचा दुसरा डोस दिला आहे. यामुळे देशात राज्य लसीकरणाच्या मोहिमेत पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत विक्रम करत आहे.

दरम्यान कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठी तयारी केली असून त्यासाठी लसीकरण मोहिम अधिक वेगानं सुरु केली आहे. बुधवारी पुन्हा एकदा राज्यानं लसीकरण मोहिमेत रेकॉर्ड ब्रेक केला आहे. बुधवारी रात्री 8 वाजेपर्यंत 14 लाख 39 हजार 809 नागरिकांना लस देण्यात आली. या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण डोसेसची संख्या 6 कोटी 55 लाखांवर गेली आहे. तर देशात सर्वाधिक 1 कोटी 79 लाख नागरिकांना लसीचा दुसरा डोस देऊन महाराष्ट्र राज्यानं देशात विक्रम केला आहे.

राज्यात 21 ऑगस्ट रोजी एका दिवसात 11 लाख 4 हजार 465, तर 4 सप्टेंबरला 12 लाख 27 हजार 224 नागरिकांचे लसीकरण झाले. त्यानंतर आता 12 लाख लसीकरणाचा रेकॉर्ड ब्रेक करत बुधवारी रात्री 8 वाजेपर्यंत सुमारे 14 लाख 39 हजार 809 लसींचे डोस एका दिवसात देण्याची विक्रम राज्याच्या आरोग्य विभागाने करुन दाखवला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!