CoronaMaharashtraUpdate : दिलासादायक : कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णाच्या संख्येत वाढ

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात ४ हजार ०५७ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ४ हजार १३० इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ५ हजार ९१६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या २ हजार ५०६ इतकी होती. तर, आज ६७ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ६४ इतकी होती. आज राज्यात झालेल्या ६७ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ९४ हजार ७६७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्के इतके झाले आहे.
दरम्यान राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५० हजार ०९५ वर आली आहे. काल ही संख्या ५२ हजार ०२५ वर होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १२ हजार ३२५ वर गेला आहे. ठाणे जिल्ह्यात मात्र ही संख्या वाढून ती ७ हजार २७३ वर आली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ६ हजार ६०३ इतकी खाली आली आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ५ हजार ७०१ वर घसरली आहे. तर, सांगलीत एकूण ३ हजार २५१ इतकी आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या २ हजार ८९६ वर खाली आली आहे.
राज्यात कुठे किती आहेत सक्रिय रुग्ण ?
मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ४ हजार ००३ इतकी वाढली आहे. तर, रत्नागिरीत १ हजार ०८७, सिंधुदुर्गात ९३०, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८४९ इतकी आहे.तर नंदूरबार, धुळे आणि वर्ध्यात प्रत्येकी दोन सक्रिय रुग्ण असून या बरोबरच, औरंगाबादमध्ये ४७७, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ५६ वर खाली आली आहे. अमरावतीत ही संख्या ९६ वर आली आहे. राज्यात नंदुरबार, धुळे आणि वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्ण असून हीच राज्यातील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.
दरम्यान आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ४८ लाख ५४ हजार ०१८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ८६ हजार १४७ (११.८२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९९ हजार ९०५ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २ हजार ००७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.