BeedNewsUpdate : करुणा शर्मा यांच्या नाट्यमय अटकेनंतर आलेल्या या व्हायरल व्हिडीओमुळे उडाली खळबळ !!

बीड : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धंनजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप करीत करुणा शर्मा परळीत दाखल झाल्यानंतर मुंडे यांच्या समर्थकांनी त्यांना जोरदार विरोध करीत घोषणाबाजी केली त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. दरम्यान परिस्थिती आटोक्यात यावी म्हणून पोलिसांनी करुणा शर्मा यांना पोलीस ठाण्यात बसवले आणि त्यांच्या गाडीची झडती घेतली तेंव्हा तपासणीत त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळल्याने त्यांना अटक करून ताब्यात घेतले. त्यावर आपल्याला गुंतवण्यासाठी हे नाट्य घडविल्याचा आरोप शर्मा यांनी केला.त्यानंतर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक तोंड पूर्णपणे झाकलेली, गॉगल घातलेली महिलेच्या ड्रेसमधील एक व्यक्ती गाडीची डिक्की उघडून त्यात काही तरी ठेवताना दिसत आहे. या व्हिडीओमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
दिवसभर चाललेल्या या नाट्यमय घडामोडीनंतर समोर आलेल्या नव्या व्हिडीओमुळे चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. करुणा शर्मा गाडीतून वैद्यनाथ मंदिरासमोरून परत जात होत्या. त्यावेळी गाडीजवळ एक महिलासदृश व्यक्ती आली आणि तिने गाडीची डिकी उघडून त्यात काहीतरी वस्तू ठेवल्याचे या व्हिडीओतून दिसून येत आहे. विशेष म्हणजे, यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असते, सर्वजण करुणा शर्मा यांच्याविरोधात घोषणाबाजी देत आहे. तिथे एक पोलीस अधिकारी सुद्धा उभा होता. एवढ्या गर्दीत या व्यक्तीने गाडीत काय ठेवलं? हि व्यक्ती कोण? असे प्रश्न आता निर्माण झाला आहे.
दरम्यान धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती आणि दबाव टाकून माझ्या गाडीत रिव्हाल्वर टाकली आणि माझ्या वरील खोटे गुन्हे दाखल केले आहेत. धनंजय मुंडे यांनी जोर जबरदस्ती बळाचा वापर केला आहे, असा आरोप करून शर्मा यांनी केला आहे.
धनंजय मुंडे- करुणा शर्मा यांच्यामधील वाद
करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा हिने सर्वात अगोदर मुंबईतील ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तसेच ट्विट करत तक्रारीची कॉपीपोस्ट केली होती. यावेळी रेणू शर्मा यांनी गंभीर आरोप केले होते, यानंतर करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यामधील संबंध व प्रकरण समोर आले. याला धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत पुष्टी दिली तसंच त्यांचे कधीपासून सहसंबंध आहेत. या संदर्भात देखील खुलासा केला. यात करुणा शर्मा यांच्यापासून धनंजय मुंडे यांना दोन आपत्य असल्याचे पहिल्यांदा धनंजय मुंडे यांनी फेसबुकवरून जाहीर केले होते.
काही दिवसानंतर रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतल्यावर हे प्रकरण तीन चार महिने शांत झाले. यावेळी धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्या सोबत घटस्फोट प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. कोर्टामध्ये केस सुरू असल्याचे फेसबुकवरील पोस्टमध्ये नमूद केले होते. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून करुणा शर्मा या संपत्ती पासून सामाजिक आणि राजकीय विषयावर ती कायम भाष्य करत होत्या. तसंच फेसबुक लाईव्ह करत होत्या. दोन दिवसांपूर्वी त्यांनी फेसबुक लाईव्ह करत मी ५ सप्टेंबरला परळीमध्ये येणार आहे आणि पत्रकार परिषद घेऊन सर्व काही सांगणार आहे, असे सांगितले होते.
करुणा शर्मा यांनी आपली भूमिका जाहीर करताच धनंजय मुंडे यांनी आपल्या वकिलामार्फत करुणा शर्मा यांना नोटीस बजावून कोणतीही पत्रकार परिषद घेण्यास मज्जाव केला तसेच प्रसार माध्यमांनाही पत्र पाठवून करुणा शर्मा यांनी दिलेली कोणतीही माहिती प्रसिद्ध करू नये , तसे केल्यास न्यायालयाचा अवमान होईल असे म्हटले होते. त्यानंतर या सर्व नाट्यमय घडामोडी परळीत घडली ज्या दिवसभर चर्चेचा विषय झाल्या.