MumbaiNewsUpdate : मराठा आणि ओबीसी आरक्षणावर आज मुख्यमंत्र्यांची बैठक

मुंबई : राज्यातील मराठा आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. गेल्या आठवड्यातही आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.
मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक आज संध्याकाळी होणार आहे. गेल्या आठवड्यात २७ ऑगस्ट रोजी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते . या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरक्षणासंदर्भात अनेक राजकीय पक्षांकडून मत मागवले होते. मुख्यमंत्र्यांनी आरक्षणावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीचे स्वागत केले होते . त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ओबीसी आरक्षणाच्या मागणीवर सर्व पक्षांनी एकजूट आणि एकमत राहिले पाहिजे.