MarathaReservationUpdate : खा. संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट

नवी दिल्ली : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील चारही पक्षाचे प्रमुख खासदार त्यांच्यासमेवत होते. यावेळी राष्ट्रपतींनीही आमची बाजू समजून घेत “मी तुमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतले आहे. मला या विषयी अभ्यासासाठी थोडासा वेळ द्या”, असे राष्ट्रपती म्हणाल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.
मराठा आरक्षण प्रश्नी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची महाराष्ट्रातील सर्वपक्षीय प्रतिनिधींसह भेट घेतली. याविषयी पत्रकार बांधवांशी सविस्तर संवाद…. 👇🏽 👇🏽https://t.co/1yrY8cNbjy
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) September 2, 2021
या भेटीबाबत खा. संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. खा. संभाजी राजे म्हणाले कि , ‘आम्ही सविस्तर पद्धतीने आमची बाजू मांडली. सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी सविस्तरपणे ऐकून घेतली आहे. राजर्षी शाहू हे आरक्षणाचे जनक असल्याचे उद्गारही राष्ट्रपतींनीही काढले. दुर्गम आणि दूरवर भागात राहणाऱ्या लोकांसाठी आरक्षण असा जो कायद्यात शब्द आहे. तो बदलण्याची विनंती या भेटी दरम्यान केली.
मराठा आरक्षणाचा प्रश्न राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासमोर मांडून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज व समाजाच्या भावना पोहोचवण्यासाठी आज खासदार संभाजीराजेंनी राष्ट्रपतींची भेट घेतली. या भेटीकरिता संभाजीराजेंनी चारही प्रमुख पक्षांना त्यांचे प्रतिनिधी पाठवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण, भाजपा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, शिवसेना खासदार विनायक राऊत व काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे हे सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.