IndiaNewsUpdate : राम मंदिर बांधण्यापासून कुणीच अडवू शकत नाही , आम्ही नेहमीच दिलेली वचने पूर्ण केली : राजनाथ सिंह

केवाडिया : अयोध्येतील राम मंदिर ही फक्त आमची घोषणाबाजी नव्हती, तर ती आमची बांधिलकी होती, आम्ही नेहमीच दिलेली वचने पूर्ण केली आहेत. तो केवळ आमच्यासाठी निवडणुकीचा मुद्दा नव्हता, तर ती आमची सांस्कृतिक बांधिलकी आहे. आता राम मंदिर बांधण्यापासून कुणीच अडवू शकत नाही, असे उद्गार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी केले. गुजरात येथे भाजपा नेत्यांना संबोधित करताना ते बोलत होते. अयोध्येत भगवान रामाचे भव्य मंदिर बांधले जात आहे . परंतु इथपर्यंत पोहोचण्यासाठी भाजप आणि राष्ट्रीय विचारधारेशी जोडले गेलेले लोक आणि संघटनेच्या लोकांनी त्यासाठी मोठे बलिदान दिले आहे.त्यासाठी आम्ही आमच्या राज्य सरकारचेही बलिदान दिले.
अब अयोध्या में भगवान श्रीराम के भव्य मंदिर का निर्माण चल रहा है मगर यहां तक पहुंचने के लिए भाजपा और राष्ट्रीय विचारधारा से जुड़े लोगों और संगठनों ने बड़ी कुर्बानी दी है। हमने इस आंदोलन में अपनी राज्य सरकारों की कुर्बानी दे दी: श्री @rajnathsingh
— Rajnathsingh_in (@RajnathSingh_in) September 2, 2021
नर्मदा जिल्ह्यातील केवाडिया येथे पार पडलेल्या बैठकीत राजनाथ सिंह बोलत होते . यावेळी त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करताना ते म्हणाले कि , नरेंद्र मोदी २०१४ साली पंतप्रधान झाल्यापासून देशात एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही आणि केंद्रात भाजपा सरकार असल्यामुळे दहशतवादी घाबरले आहेत. दरम्यान देशातील जवानांप्रती काँग्रेस संवेदनशील नसल्याचाही आरोप करताना ते म्हणाले कि , काँग्रेसने गेल्या ४० वर्षात One Rank-One Pension (OROP) हा प्रश्न सोडवला नाही.परंतु मोदीजींनी लगेच त्याची अंमलबजावणी केली. भाजपा व काँग्रेस सरकार यांच्यातील फरक यातूनच स्पष्ट होतो. काँग्रेस फक्त महात्मा गांधी यांच्या नावाचा वापर करतात, परंतु त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत नाहीत, असा आरोपही सिंह यांनी केला.
आज आतंकवादियों को भी पता है कि वे अपनी शरणगाह में भी सुरक्षित नही बचेंगे। उरी में एक घटना हुई तो हमारी सेना ने सीमा पार जाकर आतंकी ठिकानों को नष्ट किया: श्री @rajnathsingh
— Rajnathsingh_in (@RajnathSingh_in) September 2, 2021
‘आम्ही दहशतवाद्यांना यशस्वी होऊ दिले नाही. जम्मू-काश्मीर सोडाच, मोदीजी यांचे सरकार आल्यानंतर देशात कुठेही एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही. हे खूप मोठे यश आहे. दहशतवादी भाजपा सरकारला घाबरत आहेत. ही छोटी गोष्ट नाही. दहशतवाद्यांना हे कळून चुकले आहे कि , त्यांची आता गय केली जाणार नाही. उरी हल्ल्यानंतर आम्ही सर्जिकल स्ट्राईक करून जगाला हे ठणकावून सांगितले आहे कि , दहशतवाद्यांची खैर नाही.”
जब पुलवामा की घटना हुई तो हमारी बहादुर वायु सेना ने बालाकोट में मौजूद आतंकी ठिकानों को नष्ट करने में सीमा के पार जाकर कारवाई की। यानि आतंकवाद के खिलाफ अब हम सीमा के भीतर ही नहीं सीमा के उस पार भी जाकर कारवाई करने में सक्षम हैं: श्री @rajnathsingh
— Rajnathsingh_in (@RajnathSingh_in) September 2, 2021