CoronaIndiaUpdate : देशात 47 हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद , 509 कोरोना बाधितांचा मृत्यू

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 47,092 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. काल हा आकडा 41,965 एवढा होता. याचबरोबर, गेल्या 24 तासांत 509 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर 35,181 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तर सक्रिय रुग्ण संख्येत एकूण 11,402 ने वाढ झाली आहे.
दरम्यान केरळमध्ये कोरोना रुग्ण संख्या अत्यंत वेगाने वाढताना दिसत आहे. केरळमध्ये बुधवारी तब्बल 32,803 नवे कोरोना बाधित आढळून आले. तर 173 जणांचा मृत्यू झाला. या नव्या रुग्णांनंतर येथील एकूण कोरोना बाधितांची संख्या 40 लाख 90 हजार 36 वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा 20,961 वर पोहोचला आहे.