Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यात ४ हजार १९६ नवीन कोरोनाबाधित , १०४ मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : दिवसभरात राज्यात ४ हजार १९६ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, ४ हजार ६८८ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, १०४ कोरोनाबाधित रूग्णांचा आज राज्यात मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

Advertisements

राज्यात आजपर्यंत एकूण ६२,७२,८०० कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०३ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६४,६४,८७६ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १३७३१३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,३९,७६,८८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,६४,८७६(११.९८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,९१,७०१ व्यक्ती गृह विलगिकरणात आहेत. तर २ हजार १२१ व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५१,२३८ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!