CoronaMaharashtraUpdate : नवीन रुग्णवाढीची संख्या उतरणीला , बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत ३ हजार ७४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ४ हजार ६९६ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. तर कोरोनाने आणखी ५२ रुग्ण दगावले असल्याने राज्यातील मृत्यूदर सध्या २.१२ टक्के इतका आहे.
राज्यात कोरोनाचा ग्राफ खाली येत आहे. नवीन बाधितांच्या तुलनेत करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आजच्या नोंदीनुसार राज्यात करोनाचे ५१ हजार ८३४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यात मुंबईबाबत दिलासा देणारी बातमी म्हणजे मुंबईतील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ३ हजार ५०४ इतकी खाली आली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १२ हजार ७१७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर ठाणे जिल्ह्यात ही संख्या ७ हजार १५६ इतकी आहे. अहमदनगर जिल्ह्यात ५ हजार ९६१, सातारा जिल्ह्यात ५ हजार ४२१, सांगली जिल्ह्यात ४ हजार ३५६, सोलापूर जिल्ह्यात ४ हजार ६८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील स्थिती वेगाने सुधारत असून अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १ हजार ४७० इतकी आहे.
करोना संसर्गाची राज्यातील आजची स्थिती
– एकूण मृत्यू ५२
– कोरोना मृत्यूदर २.१२ टक्के
– ३ हजार ७४१ नवीन रुग्णांचे निदान.
– ४ हजार ६९६ रुग्णांना डिस्चार्ज
– बरे झालेले एकूण रुग्ण ६२,६८,११२
– राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ %
– आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,३८,१२,८२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,६०,६८० (१२.०१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह.
– सध्या राज्यात २,८८,४८९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,२९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
– राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या सध्या ५१ हजार ८३४ .