AurangabadCrimeUpdate : विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केले, नवर्यासहित सासु,सासरा,नणंद अटकेत

औरंगाबाद – तीन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या विवाहितेने रविवारी सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान या प्रकरणी वेदांतनगर पोलिसांनी नवर्यासहित सासु,सासरा, आणि नणंदेलाअटक करून कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पल्लवी योगेश खेत्रे (२२) रा.देवगिरी महाविद्यालय परिसर.असे मयत विवाहितेचे नावआहे.तर योगेश, त्याची आई कमल वडील अशोक व नणंद सुनीता पगारे ही अटक आरोपींची नावेआहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २०१८साली पल्लवी सोनवणे हिचे आत्ये भावाशी योगेश खेत्रे शी लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर पल्लवीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला तिचा नवरा योगेश मारहाण करंत होता. तर सासु कमल व सासरा अशोक माहेरुन पैशे घेऊन येण्यासाठी मारहाण करंत होते.पल्लवी चे वडील सुनिल सोनवणे (४७) रा.हर्सूल यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे त्यांना मुलीच्या सासरच्या मागण्या पूर्ण करता आल्या नाहीत.त्यामुळे त्रस्त झालेल्या पल्लवी ने रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास गळफास घेतला.वरील प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय देवकाते करीत आहेत.