MarathaReservationUpdate : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर खा. संभाजीराजे यांना दिली राष्ट्रपतींनी वेळ

मुंबई : खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ २ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे जाणार असल्याची माहिती दिली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविताना राष्ट्रपती आणि केंद्र सरकार यांची देखील भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याने खासदार संभाजीराजे यांनी राष्ट्रपतींना मराठा आरक्षण प्रश्नी मराठा समाजाच्या भावना समजावून सांगण्यासाठी वेळ मागितला होता. सोबत महाराष्ट्रातील खासदारांना देखील समवेत भेटीसाठी वेळ दिली जावे असे कळविले होते.
मा. राष्ट्रपतींना मराठा आरक्षणाविषयी समाजाच्या भावना समजाव्यात यासाठी भेट मागितली होती.
त्यानुसार त्यांनी दि २ सप्टें रोजी भेटीसाठी वेळ दिली आहे.
यावेळी सर्व पक्षीय प्रत्येकी १ खासदार प्रतिनिधींने उपस्थित रहावे, यासाठी आज सर्व पक्षाचे अध्यक्ष व गटनेत्यांना पत्र पाठवली आहेत.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 26, 2021
दरम्यान आज त्यांनी प्रमुख राजकीय पक्षांचे अध्यक्ष , लोकसभा व राज्यसभेतील सर्व पक्षीय गटनेते यांना पत्र पाठवून राष्ट्रपतींनी वेळ दिल्याचे कळवले आहे.
‘राष्ट्रपतींना मराठा आरक्षणाविषयी समाजाच्या भावना समजाव्यात यासाठी त्यांनी भेट मागितली होती. त्यानुसार त्यांनी २ सप्टेंबर रोजी भेटीसाठी वेळ दिली आहे. यावेळी सर्व पक्षीय प्रत्येकी एका खासदार प्रतिनिधींने उपस्थित राहावे, यासाठी आज सर्व पक्षाचे अध्यक्ष व गटनेत्यांना आपण पत्र पाठवली असल्याची माहिती संभाजीराजेंनी दिली आहे.
दरम्यान, कोविड काळात गर्दी जमवून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि कोविड नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी आयोजकांवर वजीराबाद पोलीस ठाण्यात नांदेडमध्ये मराठा मूक आंदोलन प्रकरणी २१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे संभाजीराजे कमालीचे संतापले आहे. जर तुम्हाला गुन्हे दाखल करायचे असेल तर माझ्यावर करा, सामान्य गरिब मराठा बांधवांच्यावर का? असा सवाल संभाजीराजेंनी उपस्थित केला होता. तर आता त्यांनी राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळा न्याय असे का? असा प्रश्नही संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे.