CoronaMaharashtraUpdate : राज्यात दररोज आढळतील ६० लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण , आरोग्य यंत्रणेला सज्ज राहण्याचा इशारा

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत राज्यात दररोज ६० लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळतील, असा अंदाज राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात असली तरी बहुचर्चित तिसरी लाट महाभयंकर असण्याची शक्यता आरोग्य विभागानेच व्यक्त केली असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या राज्याच्या आकडेवारीनुसार साताऱ्यात आज दिवसभरात तब्बल ८२१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दोन दिवसांपूर्वी हा आकडा सहाशेच्या खाली होता शिवाय मृत्यूचे प्रमाणही या जिल्ह्यात सर्वात जास्त आहे. दिवसभऱात 32 मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान आरोग्य विभागाच्या अंदाजानुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेप्रमाणेच कोरोनाची तिसरी लाट जेव्हा पीकवर असेल म्हणजे सर्वोच्च शिखर गाठेल तेव्हा मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक प्रकरणे असतील.त्यामुळे आरोग्य विभागाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत अधिक सावधानतेचा इशारा दिला असून व्यापक स्तरावर तायारी करण्याचा सल्लाही दिला आहे.
राज्यातील तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले कि , तिसऱ्या टप्यात ६० लाख लोकांना कोरोनाची बाधा होईल असा अंदाज आहे. त्यासाठी बेड आणि ऑक्सिजनची व्यवस्था केली आहे. १३ लाख लोकांना ऑक्सिजन लागेल. बाराशे मेट्रिक टन ऑक्सिजन आपण दोन हजार टन पर्यंत वाढवली आहे. राज्याने औषधसाठी वेगळी आर्थिक तरतूद केली आहे . आपण तिसऱ्या लाटेची तयारी पूर्ण करतो आहोत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पीकमध्ये मुंबईत ११ मार्चला ९१,१०० तर पुण्यात १९ मार्चला सव्वा लाख प्रकरणांची नोंद झाली होती. तिसऱ्या लाटेच्या पीकमध्ये मुंबईत १.३६ लाख, तर पुण्यात १.८७ लाख प्रकरणे सापडतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे.