CoonaMaharashtraUpdate : राज्यात ४ हजार ६५४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई : गेल्या २४ तासात राज्यात ४ हजार ६५४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच ३ हजार ३०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ५५ हजार ४५१ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ टक्के इतके झाले आहे. दुसरीकडे आज राज्यात १७० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे. सध्या राज्यात ५१ हजार ५७४ सक्रिय रुग्ण आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये सरकारकडून वेगवेगळे निर्बंध उठविण्यात येत आहेत तर दुसरीकडे राजकीय यात्रा व वादाचा भडका उडाला असतानाही ऑगस्ट महिन्यात राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली आहे. राज्यात २५ ऑगस्ट रोजी ५०,१८३ सक्रिय रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली असून १ ऑगस्टपासून यात मोठी घसरण झाली आहे. १ ऑगस्ट रोजी राज्यात ७८,९६२ सक्रिय रुग्ण होते. १० ऑगस्ट रोजी ही संख्या कमी होऊन ६६,१२३ एवढी झाली तर २० ऑगस्टला ५५,४५४ असलेली ही सक्रिय रुग्णसंख्या आणखी कमी होऊन २५ ऑगस्ट रोजी ५०,१८३ एवढी खाली आली. ऑगस्टमध्ये राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्या घसरुन २८,७७९ एवढी कमी झाली आहे. आजघडीला देशात केरळमध्ये सर्वाधिक म्हणजे १,५९,८८७ एवढी रुग्णसंख्या आहे तर देशात ३,२२,३२७ सक्रिय रुग्ण नोंद आहे.