MaharashtraPoliticalUpdate : कोरोनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांची नारायण राणे यांच्यावर नाव घेता टीका

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त शब्दात केलेली टीका मुख्यमंत्र्यांना चांगलीच झोंबली असून दोघांकडूनही परस्परांवर टीका -टिप्पणी चालू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनावर भाष्य करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “पोस्ट कोविड हा जो प्रकार आहे की, आहे ते टिकवले पाहिजे आणि दुसरे म्हणजे चांगल्या गोष्टी वाढवायला हव्यात. दुर्दैवाने काय होतं, आजचं जे वातावरण आहे, थोडं सावधानतेने मी पाऊल टाकत आहे.
अजूनही थोडे दिवस थांबायला हवं, कोरोनाचं संकट खरचं गेलंय का? अजून पूर्ण गेलेलं नाहीये. थोडंस आहे. काही-काही तर जुने व्हायरस पण परत आले आहेत. आणि जुने व्हायरस सुद्धा कारण नसताना साईड इफेक्टस आणत आहेत. तर त्या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे.”
दरम्यान भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर निशाणा साधताना मुख्यमंत्री म्हणाले कि , पर्यटन हे असं क्षेत्र आहे, सर्वांना फिरण्यासाठी आवडतं. काही जणांचं राजकीय पर्यटन असंत इथून तिथं आणि तिथून इथे. काहीजण प्रवासी असतात ते वेगवेगळी ठिकाणे पाहत असतात. मधल्या काळात केंद्र सरकारने एक व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली होती त्यात त्यांनी सांगितलं होतं, सावधनता बाळगा.