NarayanRaneNewsUpdate : नारायण राणे यांना हायकोर्टाचा १७ सप्टेंबरपर्यंत दिलासा

मुंबई : मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी नारायण राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नारायण राणेंच्या याचिकेवर सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाकडून एक मोठा दिलासा मिळाला आहे.
नारायण राणे यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी १७ सप्टेंबर रोजी होणार आहे. तसेच तोपर्यंत नारायण राणेंना अटक करण्यात येणार नसल्याची तसेच त्यांच्यावर कुठलीही कारवाई करणार नसल्याची ग्वाही राज्य सरकारने हायकोर्टात दिली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना १७ सप्टेंबरपर्यंत एक दिलासा मिळाला आहे.नारायण राणेंच्या विरोधात इतर ठिकाणी जिथे गुन्हे दाखल आहेत त्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. नारायण राणेंनी २३ ऑगस्ट रोजी केलेले वक्तव्य प्रक्षोभक नव्हते अशी प्रतिक्रिया नारायण राणेंचे वकील अॅड सतीश मानेशिंदे यांनी दिली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रे दरम्यान मुख्यमंत्र्यांवर टीका करताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी राज्यातील विविध पोलीस ठाण्यात नारायण राणेंच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. यामध्ये महाड, नाशिक, पुणे आणि ठाण्याचा समावेश आहे. मात्र, हे सर्व गुन्हे रद्द करण्यात यावेत अशी मागणी करणाची याचिका नारायण राणेंनी हायकोर्टात केली होती आणि त्यावर आज सुनावणी झाली.
राणे यांची पत्रकार परिषद
दरम्यान आज हायकोर्टाने १७ तारखेपर्यंत दिलासा दिलासा दिल्या नंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ‘तुम्ही कोणीही माझं काही करू शकत नाही, शिवसेना वाढली त्यामध्ये माझा मोठा सहभाग आहे. आताचे कुणीही नव्हते. ज्यांना आंदोलन करायचं, त्यांनी करावं, त्यांना आमचा बंदोबस्त करायचा करू द्या, कायद्या परिस्थितीची स्थिती, पोलीस बघतील’ असे म्हणत भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अटकेनंतर पहिल्यांदाच आपली भूमिका मांडली.
आ. बांगरला दिले उत्तर
शिवसेनेचे हिंगोलीमधील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करत कोथळा बाहेर काढण्याचं वक्तव्य केलं होतं. बांगर यांच्या टीकेला आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलंय. ज्यांने आयुष्यात साधा उंदीर मारला नाही, तो काय कोथळा काढणार असं राणे म्हणाले.