MarathawadaNewsUpdate : नारायण राणे यांना कोथळा बाहेर काढण्याची सेने आमदाराची थेट धमकी !!

हिंगोली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केल्यामुळे संतापात शिवसैनिकांनी काल राज्यभरात भाजपच्या कार्यालयांना लक्ष करून नारायण राणे यांचा तीव्र शब्दात निषेध केला औरंगाबाद शहरात त्यांच्या प्रतिमेला जेडे मारण्यात आले. दरम्यान राणे प्रकरण सर्वत्र गाजत असतानाच हिंगोली येथील शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी थेट राणेंचा कोथळा बाहेर काढण्याची भाषा वापरली आहे. याप्रकरणी भाजप कार्यकर्ते तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहेत.
राज्यात काल मंगळवारी नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटले. या प्रकरणातून आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी राणेंविरोधात चार शहरात गुन्हे दाखल केले आहेत. तसेच, राज्यात शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यानं मोठा तणाव निर्माण झाला होता. राज्यभरात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परविरोधी आंदोलन केलं.
दरम्यान हिंगोलीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचा मात्र राणेंवर टीका करताना तोल घसरला त्यांनी थेट राणेंचा कोथळा बाहेर काढण्याची भाषा केल्याने भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाले आहे. ‘तू काय सांगतो कुठे यायचं. तुझ्या घरात येऊन तुला मारण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. पोलिसांना जरा बाजूला करा. हा संतोष बांगर, शिवसेनेचा मावळा, छत्रपतीचा मावळा, तुला चारीमुंड्या येऊन चीत नाही केलं, तुझा कोथळा बाहेर नाही काढला तर संतोष बांगर असं नाव सांगणार नाही,’ अशा शब्दांत संतोष बांगर यांनी राणेंवर टीका केली आहे.