MaharshtraPoliticalUpdate : नारायण राणेंची अटक आणि पडद्यामागच्या घडामोडी , जाणून घ्या काय झाले ?

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणे भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणात पोलिसांनी राणेंना अटक केली करून न्यायालयासमोर हजर केले आणि सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली परंतु न्यायालयाने त्यांना सशर्त जमीन मंजूर केला .दरम्यान या पार्श्वभूमीवर या सर्व घडामोडी घडत असताना महाविकास आघाडी सरकारची बैठक घेण्यात आली. या बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने राणेंचा विषय आता जास्त ताणू नये, असा विचार मांडला असून याबद्दल अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणार आहे.
या बैठकीला बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील आदी नेते उपस्थितीत होते. या बैठकीत नारायण राणे यांना रात्री जामीन मिळावा, आता हे प्रकरण आणखी वाढवू नये असा सूर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी लगावला होता. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या भूमिकेला मुख्यमंत्री प्रतिसाद देतील आणि वादावर पडदा पडेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान राणे यांना जामीन मिळाला असला तरी प्रकृतीच्या कारणामुळे राणे पुढचा दौरा ते करणार नाहीत, असे वृत्त आहे.
दरम्यान, राणेंनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज दाखल केला होता. पण, जामीन अर्ज फेटाळून लावल्यामुळे पोलिसांनी राणेंना अटकेची प्रक्रिया सुरू केली. पण, दुसरीकडे राणेंनी हायकोर्टाचे दार ठोठावले. दुपारी हायकोर्टाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी नारायण राणेंना झाली होती. तांत्रिक अडचणींमुळे आज याचिका दाखल होऊ शकली नाही. उद्या सकाळी याबद्दल याचिका दाखल होईल. कारण, गुन्हे दाखल केल्याचे ओरीजनल डॉक्युमेंट दिल्याशिवाय शिवाय न्यायालयाने याचिका दाखल करुन घेण्यास नकार दिला आहे. तसेच , फौजदारी गुन्हे असल्याने राणे यांना उद्या कोर्टात हजर व्हावं लागणार आहे. दुसरीकडे राणे यांनी आधीपासूनच अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे, त्यामुळे त्याची सुनावणी मुंबईत होईल. तर, आता अलिबागचे एसपी आणि IG महाडला आल्यावर एक बैठक होणार आहे.
… आणि राणे यांना जामीन मिळाला
नारायण राणे यांना गोळवलीमध्ये अटक केल्यानंतर महाड येथे आणण्यात आले. त्यानंतर महाड न्यायदंडाधिकारी बाबासाहेब पाटील यांच्यासमोर सुनावणी पार पडली. यावेळी, राणे यांचे कुटुंबीय सुद्धा न्यायालयात हजर होते.यावेळी पोलिसांनी राणे यांची सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. परंतु, नारायण राणे यांचे वकील आदिक शिरोडकर यांनी युक्तिवाद केला. नारायण राणे यांचं वय आणि प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना जामीन द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान नारायण राणे यांना कोणती औषधे सुरू आहेत याबाबत वकिलांनी न्यायालयात माहिती दिली. यासोबत प्रकृती पाहता जामीन द्यावा अशी विनंती केली आहे. राणेंना मधुमेह, उच्चरक्तदाबाचा त्रास आहे, यावर त्यांची औषध सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली. तसंच, नारायण राणे यांना अटक करण्यापूर्वी कोणतीही नोटीस देण्यात आली नसल्याचे राणेंच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं.