CoronaMaharashtraUpdate : राज्यात ४ हजार ३५५ नवे रुग्ण तर ४ हजार २४० रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई : दिवसभरात राज्यात ४ हजार ३५५ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ४ हजार २४० रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, १९९ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.राज्यात आजपर्यंत ६२,४३,०३४ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०५ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६४,३२,६४९ झाली आहे. आतापर्यंत राज्यात १,३६,३५५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे.सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,२६,३२,८१० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,३२,६४९(१२.२२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,०१,९५५ व्यक्त गृहविलगीकरणात आहेत. तर, २ हजार ३३० व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण ४९ हजार ७५२ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.