AuranganadNewsUpdate : मोठी बातमी : औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाला आता अप्पर पोलीस महासंचालकाचा दर्जा

राज्यातील १७ अपर पोलीस महासंचालक दर्जाच्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
औरंगाबाद : राज्याच्या गृहविभागाने आज राज्यातील अपर पोलीस महासंचालक दर्जाच्या पदावर भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आणि पदोन्नतीचे आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार औरंगाबादकरांसाठी मोठी बातमी म्हणजे औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाला आता अपर पोलीस महासंचालकाचा दर्जा प्राप्त झाला असून या पदावर पदोन्नतीने डॉ. निखिल गुप्ता यांनाच कायम करण्यात आले आहे. मात्र याचा नक्की कोणता फायदा या निर्णयाने होणार हे मात्र स्पष्ट झालेले नाही.
या आदेशानुसार राज्यातील १७ अप्पर महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून या आदेशाचे विशेष म्हणजे सह पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हेशाखा, मुंबई शहर हे पद सध्या विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जासाठी होते मात्र आता हा दर्जा स्थगित करून आता या पडला अप्पर पोलीस महासंचालक श्रेणीत टाकण्यात आले आहे. या बदलानुसार आता अपर पोलीस महासंचालक श्रेणीतील सह पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हेशाखा, मुंबई शहर हे नवीन पद धनमाण करण्यात येत असून त्यावर निकेत कौशिक यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर या शहराचा विशेष पोलीस महानिरीक्षकाचा दर्जा सुद्धा स्थगित करून या पदालाही अप्पर पोलीस महासंचालक श्रेणीत रूपांतरित करण्यात आले असून या पदावर पदोन्नतीने डॉ. निखिल गुप्ता यांना हे पद देण्यात आले आहे.
आजच्या बदल्यांच्या आदेशामध्ये पुढील अधिकाऱ्यांना पुढे दिल्याप्रमाणे पोस्टिंग देण्यात आल्या आहेत.
१. ए.एम.कुलकर्णी , अपर पोलीस महासंचालक,सुधार सेवा, पुणे.,
२. संजय वर्मा , अपर पोलीस महासंचालक (नियोजन व समन्वय), महाराष्ट्र राज्य, मुंबई.,
३ . एस. जगन्नाथन , अपर पोलीस महासंचालक व संचालक, सुरक्षा व अंमलबर्जावणी, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ सूत्रधारी कंपनी मर्यादित . मुंबई,
४ . रितेश कुमार, अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग , महाराष्ट्र राज्य, पुणे.
५ . संर्जीव के . सिंघल , अपर पोलीस महासंचालक (आस्थापना), महाराष्ट्र राज्य, मुंबई.
६. अर्चना त्यागी , अपर पोलीस महासंचालक व सहव्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
७ . प्रशांत एस.बुर्डे , अपर पोलीस महासंचालक व मुख्य दक्षता अधिकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण, मुंबई.
८ . अनुप कुमार बलबीर सिंह , अपर पोलीस महासंचालक (प्रशासन), महाराष्ट्र राज्य, मुंबई.
९ . सुनील रामानंद , अपर पोलीस महासंचालक /संचालक, दळणवळण व परिवहन ,महाराष्ट्र राज्य, पुणे.
१० .प्रवीण सयाजीराव साळूंके , अपर पोलीस महासंचालक (विशेष अभियान ), महाराष्ट्र राज्य, मुंबई.(पदोन्नतीने)
११. मधुकर पांडे अपर पोलीस महासंचालक,आर्थिक गुन्हे शाखा, महाराष्ट्र राज्य, मुंबई. (पदोन्नतीने) ,
१२. ब्रिजेश सिंह अपर पोलीस महासंचालक व उप महासमादेशक, गृह रक्षक दल,महाराष्ट्र राज्य, मुंबई. (पदोन्नतीने)
१३ . चिरंजीव प्रसाद , अपर पोलीस महासंचालक, राज्य राखीव पोलीस बल, महाराष्ट्र राज्य, मुंबई. (पदोन्नतीने)
१४. डॉ. रवींद्रकुमार सिंघल नियंत्रक वैधमापनशास्त्र, महाराष्ट्र राज्य, मुंबई ( सध्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्रेणीतील पद अपर पोलीस महासंचालक श्रेणीमध्ये उन्नत करुन) (पदोन्नतीने),
१५. कुलवंत कुमार सारंगल, अपर पोलीस महासंचालक (आस्थापना), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची अपर पोलीस महासंचालक (आस्थापना), महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदावरून अन्यत्र बदली करण्यात येत असून, त्यांचे पदस्थापनेबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.
१६. औरंगाबाद पोलीस आयुक्तपदाची श्रेणी अपर पोलीस महासंचालक बदलून या जागेवर डॉ . निखिल गुप्ता यांना पदोन्नती देण्यात आली आहे.