Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : ध्वजारोहणानंतर मंत्रालयासमोर शेतकऱ्याचा आत्महदहनचा प्रयत्न

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : मुंबईत एकीकडे मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. तर, दुसरीकडे याच मंत्रालयाच्या परिसरात राज्यातील एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आत्महदहनचा प्रयत्न करणार शेतकरी मुळचा जळगावमधील असून, सुनील गुजर असे त्याचे नाव आहे.

Advertisements

मका व सोयाबीन व्यवहारात आडकाठी होत असल्याचे या शेतकऱ्याचे म्हणणे आहे आणि यातूनच या शेतकऱ्याने आज मंत्रालय परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे.

Advertisements
Advertisements

या विषयी एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयात ध्वजारोहण करून बाहेर पडल्यानंतर, वाहतूक सुरळीत झाली व सुरक्षा व्यवस्थेत थोडी शिथिलता आल्यानंतर या शेतकऱ्याने मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. सध्या त्या शेतकऱ्यास मरिनड्राईव्ह या पोलीस स्टेशनला नेण्यात आले असून, चौकशी सुरू आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!