AurangabadCrimeUpdate : अॅट्राॅसिटीच्या गुन्ह्यात,सैनिकासह एकाची हर्सूल कारागृहात रवानगी

औरंगाबाद – १६ वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या भूखंडाचा काही भाग न बळकावता आल्यामुळे महिला वकीलाला जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या गुन्ह्यात दोघांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. विजय भूजबळ आणि कुंडलिक सानप अशी अटक आरोपींची नावे आहेत.विजय भूजबळ हे सैन्यदलात नौकरी करतात.
जयसिंगपुर्यात अॅड. आशा दांडगे यांचा १२००स्व्केअर फुटाचा भूखंड आहे.त्यावर विजय भूजबळ यांनी जनावरांचा गोठा बनवला आहे. तो हटवण्यासाठी अॅड.दांडगे यांनी भूजबळ यांना सांगितले असता भूजबळ व सानप यांनी अॅड.दांडगे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार छावणी पोलिसांकडे केली.त्या तक्रारीवरुन पोलिसांनी अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करंत वरील आरोपींना अटक केली व कोर्टापुढे उभे केले असता कोर्टाने आरोपींची हर्सूल कारागृहात रवानगी केली. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त विवेक सराफ करीत आहेत.