Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ParliamentNewsUpdate : मराठ्यांना आरक्षण द्या पण मुस्लिमांचे काय ? : ओवेसी यांचा सरकारला सवाल

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली : मराठ्यांना आरक्षण द्या पण मुस्लिमांच्या आरक्षणाचं काय? असा सवाल करत, आज लोकसभेत एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी महाराष्ट्र सरकार व मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

Advertisements

”आम्ही केवळ भिकारी आहोत का? तुम्ही मत मिळवाल, तुम्हाला नेता बनवणार, मुख्यमंत्री बनवणार, पंतप्रधान बनवणार आणि आम्हाला काय मिळणार इफ्तारची दावत आणि तोंडात खजूर? आरक्षण नाही मिळणार आम्हाला? हा कोणता न्याय आहे?” असेही ओवेसींनी म्हटले आहे.

Advertisements
Advertisements

”शिवसेना, राष्ट्रवादीवाले म्हणताहेत मराठा.. मराठा. मेहमूद रेहमान कमिटीच्या रिपोर्टने सांगितलं होतं महाराष्ट्रात की मुस्लमान सामाजिकदृष्ट्या शैक्षणिक मागास आहे आणि तुम्ही केवळ मराठ्यांबाबत बोलत आहात. मुस्लिमांबाबत का नाही बोलणार? मुस्लिमांच्या त्या ५० जाती ज्या महाराष्ट्रात मागास आहेत ते तुमचा तमाशा पाहत आहे व तुम्हाला उघडे पाडतील. तुम्ही त्यांच्याबाबत बोलतच नाही. मराठ्यांना आरक्षण नक्कीच द्या, पण तुमच्या या विशाल हृदयात त्या गरीब मुस्लिमांसाठी जागा नाही का?” असा सवाल ओवेसींनी केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!