Maharashtra News Update : पोलिसउपनिरीक्षक पदोन्नती प्रकरणी आपण लक्ष घालू – देवेंद्र फडणवीस

औरंगाबाद : (जगदीश कस्तुरे) २०१३सालच्या अर्हता परिक्षेत पास असलेल्या उर्वरित २५०जणांच्या पदोन्नती प्रक्रियेत उशीर का लागत आहे.या प्रकरणात आपण लक्ष घालू अशी माहिती विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी “महानायक”शी बोलतांना दिली.
२०१३ची अर्हता परिक्षा उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांपैकी १२मे २०२१ रोजी १हजार ८०उमेदवारांची यादी प्रसिध्द झाली होती.त्यानंतर ३१मे रोजी ६१९पदोन्नती करण्यात आल्या होत्या.तर ३१जून २१रोजी ३९उमेदवारांना पदोन्नती देण्यात आली होती. तर आणखी २५०पदोन्नत्या बाकी आहेत.
काय असू शकतात तांत्रिक अडचणी ?
या संदर्भात वरिष्ठ पोलिस सूत्रांनी खुलासा करतांना म्हटले की, पदोन्नतीस पात्र असलेल्या उमेदवारांचे सर्विस बुक तपासले जाते.त्यांच्या विरोधात काही गंभीर तक्रारी आहेत का ?
पदोन्नती झाल्यानंतर वेतनश्रेणीत वाढ हौते.त्याबाबत काही शासकीय अडचणी आहेत का ?
अप्पर पोलिस महासंचालकांचे अजब प्रश्न !!
या प्रकरणी आस्थापना विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक राजेश प्रधान यांना विचारले असता त्यांनी म्हटले की,शनिवारी रविवारी आम्हाला सुट्टी असते पत्रकारांनी आम्हाला सुटीच्या दिवशी का ? फोन करावा ? माध्यमांना या विषयावर कशाला बातम्या हव्यात हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे.पत्रकार लोक पोलिसांकडून अशा बातम्या जाणून घेण्यासाठी साटेलोटे करतात.
दैनिक महानायक ने पोलिस महासंचलनालयाच्या किती बातम्या छापल्या याचा हिशोब द्या. अप्पर पोलिस महासंचालकांच्या या वक्तव्यावर फडणवीस यांनी आश्र्चर्य व्यक्त केले. एखादा वरिष्ठ अधिकारी एवढे बेजबाबदार विधान कसे करतो ? असेेेही शेवटी म्हणााले.