MaharashtraRainUpdate : सावधान , पुढील पाच दिवस अतिवृष्टीचे

पुणे : राज्याच्या हवामान विभागाने राज्यातल्या पुढील पाच दिवसांसाठी काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामध्ये ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. ठाण्यात आज आणि उद्या तर मुंबईत उद्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान रायगड आणि रत्नागिरीमध्येही पुढील चार दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला असून पुणे आणि सातारा जिल्ह्यात पुढचे तीन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
IMD has issued district level Heavy rainfall at isolated places warnings for period 29 Jul to 2 Aug 2021 for Maharashtra. 5th day there is no warning.
for further details pl visit @RMC_Mumbai and @RMC_Nagpur websites of IMD pic.twitter.com/Byp8PUJqZB— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 29, 2021
गेल्या आठवड्यात राज्यात झालेल्या पावसाने काही जिल्ह्यांत हाहाकार उडाला. पावसाने विश्रांती घेतल्यानं पूरग्रस्त जिल्ह्यांतील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच हवामान विभागाने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्यासह पुराच्या फटक्यातून सावरत असलेल्या जिल्ह्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचं संकट ओढवण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दोन ऑगस्टपर्यंतची पावसाची माहिती दिली असून, यात रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरसह इतर काही जिल्ह्यांना इशारा देण्यात आला आहे.