MumbaiCrimeUpdate : राज कुंद्राला आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई : अश्लील चित्रपट प्रकरणी राज कुंद्राची पोलीस कोठडी आज संपल्यानांतर कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी राज कुंद्राच्या अडचणींमध्ये वाढ होवू लागली आहे. राज कुंद्रासोबत त्याचा सहकारी रायन थॉर्पच्याही न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. तर राज कुंद्राचे वकील सुभाष जाधव यांनी राज कुंद्राच्या जामिनासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या सुनावणी पार पडणार आहे.
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने २० जुलैला अटक केली आहे. पोर्नोग्राफीच्या आरोपांखली अटक करण्यात आलेल्या राज कुंद्राविरेधात पोलिसांच्या हाती अनेक पुरावे लागले आहेत. राज कुंद्राच्या अटकपासूनच रोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यानंतर राज कुंद्राच्या अडचणींमध्ये वाढ होवू लागली आहे.
अश्लील चित्रपट निर्मितीच्या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने याच वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये मढ येथील एका बंगल्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली होती. त्यानंतर राज कुंद्र यांनी तातडीने आपल्याकडी सर्व डेटा डिलीट केला होता आणि तसेच त्यांनी आपला मोबाइल फोनही बदलला होता, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. त्यामुळे २० जुलैला राज कुंद्राला अटक झाल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. दरम्यान या प्रकरणी राज कुंद्र आणि शिल्पा शेट्टीच्या बँका खात्यांची देखील मुंबई गुन्हे शाखेने चौकशी केली असता खळबळजनक माहिती समोर आली आहे. राज कुंद्राच्या बँक खात्यांमधून कोट्यावधी रुपयांचे व्यवहार होत असल्याचे उघड झाले आहे. तर राज कुंद्राची कानपूरमधील दोन बँक खाती सील करण्यात आली आहेत.
Maharashtra: A court in Mumbai sends actor Shilpa Shetty's husband Raj Kundra and Ryan Thorpe to judicial custody for 14 days in the pornography racket case pic.twitter.com/EZsynUAZt5
— ANI (@ANI) July 27, 2021