BankInformationUpdate : ऑगस्ट महिन्यात बँकांना सर्वाधिक सुट्या !!

मुंबई : ऑगस्ट महिन्यात आठ दिवस सार्वजनिक सुट्ट्या आल्याने जवळपास १५ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना बँकेची कामे पूर्ण करण्यासाठी बँकांच्या कामकाज दिवसांची माहिती घेऊन नियोजन करावे लागणार आहे.
बँकांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार सर्वच राज्यांना या आठ सार्वजनिक सुट्या नसतील. तसेच सर्वच राज्यांमध्ये सलग १५ दिवस बँका बंद राहणार नाहीत. मात्र सार्वजनिक सुट्टया आणि शनिवार-रविवार असे जवळपास १५ दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.
ऑगस्ट महिन्याची सुरुवात साप्ताहिक सुट्टीने होणार आहे. १ ऑगस्ट २०२१ रोजी रविवार आहे. त्याशिवाय ८ ऑगस्ट, १५ ऑगस्ट , २२ ऑगस्ट आणि २९ ऑगस्ट रोजी रविवार असल्याने बँका बंद राहतील. त्याशिवाय दुसरा आणि चौथा शनिवार अनुक्रमे १४ ऑगस्ट आणि २८ ऑगस्ट रोजी असल्याने याही दिवशी बँका बंद राहणार आहेत. राज्यात १६ ऑगस्ट रोजी पारशी नववर्षानिमित्त मुंबई आणि नागपूरमध्ये बँकांना सुट्टी असेल. १९ ऑगस्ट रोजी मोहरम निमित्त बँकांना राष्ट्रीय सुट्टी राहणार आहे. उर्वरित सुट्या देशातील इतर राज्यात आहेत.