AurangabadNewsUpdate : भाजपच्या पदाधिकाऱ्याला शिवसेना कार्यकर्त्यांकडून मारहाण

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये भाजपकडून चालविल्या जाणाऱ्या लसीकरण केंद्रावरील भाजपचे पदाधिकारी प्रा. गोविंद केंद्रे यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी मारहाण केली असल्याची तक्रार भाजपने केली असून या मारहाणीत गंभीर जखमी झालेले केंद्रे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून म्हटले आहे कि , शिवसेनेने भारतीय जनता पार्टी चे व्हॅक्सिन सेंटर चालविणारे पदाधिकारी , कार्यकर्ते यांच्यावर जो भ्याड हल्ला केला नुसताच भ्याड हल्ला केला नाही.तर एका शिवसेनेचे च्या मंत्र्यांच्या कार्यालयात नेऊन मारहाण केली त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी संभाजीनगर शहराध्यक्ष या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो. अशा भ्याड हल्ल्याने भारतीय जनता पार्टी खचणार नाही अजून जोमाने जनसेवा करेल.
भाजपच्या तक्रारीनुसार औरंगाबाद गारखेडा येथील लसीकरण केंद्रावर भाजपचे सरचिटणीस प्रा. गोविंद केंद्रे आणि शिवसेना नेते राजेंद्र जंजाळ यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर राजेंद्र जंजाळ यांनी गोविंद केंद्रे यांना गाडीत घालून शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे यांच्या कार्यालयात नेले.भुमरे यांच्या कार्यालयात काही शिवसेनेचे गुंड बोलावून केंद्रे यांना कार्यालयात मारहाण करण्यात आली. या मारहाणीत केंद्रे जबर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.