MaharashtraRainUpdate : तळियेनंतर रत्नागिरी जिल्ह्यात खेड पोसरे येथेही दरड कोसळून १७ ठार

रत्नागिरी : महाडच्या तळियेनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड पोसरे येथेही दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत गाडल्या गेलेल्या १७ जणांचे मृतदेह काढण्यात यश आले आहे. यामध्ये सात घर दरडी खाली गाडली गेली होती. अजून शोध कार्य सुरु आहे. यामध्ये सात जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
याबाबत जिल्हा माहिती कार्यालयाकडून मिळाल्या माहितीनुसार खेड पोसरे येथे काल झालेल्या दरड दुर्घटनेतील मृतांमध्ये रंजना रघुनाथ जाधव (५० वर्ष), रघुनाथ जाधव (५५ वर्ष), विकास विष्णु मोहिते (३५ वर्ष), संगिता विष्णु मोहिते (६९ वर्ष), सुनिल धोंडीराम मोहिते (४७ वर्ष), सुनिता धोंडीराम मोहिते (४२ वर्ष), आदेश सुनिल मोहिते (२५ वर्ष), काजेल सुनिल मोहिते (१९वर्ष),सुप्रिया सुदेश मोहिते (२६ वर्ष), विहान सुदेश मोहिते (६वर्ष), धोडीराम देवू मोहिते (७१ वर्ष), सविता धोडीराम मोहिते (६९वर्ष), वसंत धोडीराम मोहिते (४४ वर्ष), वैशाली वंसत मोहिते ( ४४ वर्ष), प्रिती वसंत मोहिते (९ वर्ष ), सचिन अनिल मोहिते (२९ वर्ष ), सुमित्रा धोडू म्हापदी (वर्ष ६९) यांचा समावेश आहे.
या दुर्घटनेत जखमी झालेल्यामध्ये अनिल रघुनाथ मोहिते (४९ वर्ष), वसंती रघुनाथ मोहिते (६८ वर्ष), प्रिती सचिन मोहिते (२७ वर्ष), सुरेश अनिल मोहिते (२७ वर्ष), सनी अनिल मोहिते (२५ वर्ष), सुजेल वसंत मोहिते(१८ वर्ष), विराज सचिन मोहिते (४ वर्ष), यांचा समावेश आहे.
#MahadLandslide
🔸Raigad Dt adm,Maha reptd 🔸Landslide at Vill Taliye
🔸Arnd 32 houses buried 🔸72-76 pers feared trapped
🔸Under heavy debris
🔸Of mountainside
🔸@5Ndrf team on site
🔸32 bodies so far
🔸Toll May rise
🔸Slides elsewhere too@HMOIndia @PIBMumbai @ANI @NDRFHQ pic.twitter.com/AUjOskESsw— ѕαtчα prαdhαnसत्य नारायण प्रधान ସତ୍ୟ ପ୍ରଧାନ (@satyaprad1) July 23, 2021
तळियेतील बचाव कार्य सुरूच
महाड तालुक्यातील तळीयेत दरड कोसळून तब्बल ३२ घरं दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली गडप झाली. या दुर्घटनेत मालमत्तेच्या नुकसानीबरोबरच प्रचंड जीवितहानी झाली. दरडीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना बाहेर काढण्याचं कामं काल सकाळपासून सुरू असून, अद्यापही ५२ बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. युद्धपातळीवर कार्य केलं जात आहे. तळीयेच्या या दुर्घटनेत ३५ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिल्ली आहे. याशिवाय बेपत्ता झालेल्यांमध्ये ३५ महिला, १० मुलांचा समावेश आहेत. तसेच दहा वर्षाखालील दोन मुलंही या दुर्घटनेत बेपत्ता आहेत.
एनडीआरएफच्या तीन पथकांच्या मदतीने मातीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे. तसंच बेपत्ता ग्रामस्थांचाही शोध घेतला जात आहे, असं सांगतानाच या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून ५ लाखाची तर पंतप्रधान कार्यालयाकडून प्रत्येकी दोन लाखांची मदत देण्यात येणार आहे. तसेच राज्य सरकार जखमीवर मोफत उपचार केले जाणार आहेत, असे चौधरी यांनी सांगितले.