CoronaMaharashtraUpdate : राज्यात ६ हजार ७५३ नवे रुग्ण , ५ हजार ९७९ रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई : गेल्या २४ तासात राज्यात एकूण ६ हजार ७५३ नव्या कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. या बरोबरच आज एकूण ५ हजार ९७९ इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, आज दिवसभरात एकूण १६७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर आता थेट २.०९ टक्के इतका झाला असून नवे कोरोनाबाधित जरी कमी असले, तरी मृतांचा आकडा ही राज्य सरकार आणि आरोग्य प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरली आहे.
Mumbai reports 374 new #COVID cases, 482 recoveries, and 08 deaths in the past 24 hours.
Active cases: 5,779
Total recoveries: 7,09,198
Death toll: 15,757 pic.twitter.com/a1RvErBq2O— ANI (@ANI) July 23, 2021
राज्यात गुरुवारी ७ हजार ३०२ नवे कोरोनाबाधित सापडले होते. मात्र, त्यासोबतच ७ हजार ७५६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, आज ही संख्या कमी होऊन ५ हजार ९७९ इतकी झाली आहे. दरम्यान राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता ६२ लाख ५१ हजार ८१० इतका झाला आहे तर आजपर्यंत ६० लाख २२ हजार ४८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३३ टक्के एवढे झाले आहे.
राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या
तसेच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या खाली आली असून ती ९४ हजार ७६९ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १५ हजार ८०९ इतका आहे. तर, पुण्याच्या खालोखाल कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ११ हजार ४९२ इतके रुग्ण आहेत. तर, त्यानंतर ठाणे जिल्ह्यात ११ हजार २१४ रुग्ण सक्रिय आहेत. सांगलीत ही संख्या १० हजार ६८९ इतकी आहे. तर, मुंबई महापालिका हद्दीत सध्या १० हजार ०६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. साताऱ्यात ही संख्या ७ हजार २८१, अहमदनगरमध्ये ४ हजार ३४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, रायगडमध्ये २ हजार ५९९, रत्नागिरीत २ हजार ५४२, सिंधुदुर्गात २ हजार ३०१, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ०३२ इतकी आहे. तर, नागपूर जिल्ह्यात ही संख्या १ हजार ७०० इतकी झाली आहे.