Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiCrimeUpdate : पॉर्नोग्राफी प्रकरण : राजबरोबर शिल्पा शेट्टीवरही चौकशीची टांगती तलवार !!

Spread the love

मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने अटक केल्यानंतर  त्याला न्यायालयाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. राजसोबत रायन थार्पला देखील पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान  याप्रकरणी शिल्पा शेट्टीवरही चौकशीची टांगती तलवार असल्याचे वृत्त असून पोलिसांनी आतापर्यंत त्याच्या अनेक बँक खात्यातून  आणि अन्य माध्यमातून ७.५ कोटी रुपये जप्त केले आहेत. दरम्यान शिल्पा शेट्टीने आपले सर्व कार्यक्रम सध्या थांबवले आहेत. 

राजची पत्नी शिल्पा शेट्टी ही राजसोबत त्याच्या  सर्वच  कंपन्यांमध्ये भागीदार आहे. राजच्या या सर्व प्रकरणाची  शिल्पाला माहिती होती का?  याचा शोध आता पोलीस घेत आहेत. त्यामुळे लवकरच शिल्पाला चौकशीसाठी बोलवण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भरांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा शेट्टीचा या प्रकरणात सहभाग आहे की नाही हे आतापर्यंत झालेल्या चौकशीत स्पष्ट झालेले नाही. अद्याप या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

या प्रकरणाची माहिती देताना पोलिस आयुक्तांनी सांगितले की, ‘ राज कुंद्राच्या दोन्ही कंपन्या लंडनमध्ये आहेत. परंतु त्याचे सर्व कामकाज मुंबईतील ऑफिसमधून चालायचे. त्यामुळे राज कुंद्राचा आयटी प्रमुख रायन थार्पला अटक केली आहे. ‘ ते पुढे म्हणाले, ‘ त्यांची कार्यपद्धतीची माहिती घेतली. हे लोक काम करताना नवीन मॉडेल आणि अभिनेत्रींना वेब सीरिजमध्ये, सिनेमामध्ये काम करण्यासाठी बोलावायचे. त्याचे चित्रीकरण सुरू असतानाचा त्यांचा पॉर्न व्हिडीओ केला जायचा. याप्रकरणी आतापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे. तसेच विविध ठिकाणी घातलेल्या छाप्यांमधून इलेक्ट्रॉनिक सामान जप्त केले आहे.’

दरम्यान, या पॉर्नोग्राफी प्रकरणी फेब्रुवारी २०२१ मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. यावेळी काही महिलांना घेऊन अश्लिल व्हिडीओ केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. यामध्ये गहना वशिष्ठसहित अनेक आरोपी होते. पोलीस आयुक्तांनी पुढे सांगितले की राज कुंद्राचा नातेवाईक लंडनमध्ये एक कंपनी चालवतो. परंतु त्याची देखरेख राज कुंद्राच करायचा. हॉटशॉट अॅपवर या कंपनीची माहिती आहे. इतकेच नाही तर अॅपल स्टोर आणि गुगल प्ले स्टोअरवरून २०२० मध्ये हा अॅप काढून टाकण्यात आला होता. कोर्टाकडून आदेश मिळाल्यानंतर ठिकठिकाणी पोलिसांनी छापे घातले. त्यावेळी अनेक पुरावे आणि भरपूर माहिती मिळाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!