ParliamentNewsUpdate : विरोधकांच्या प्रचंड गोंधळामुळे संसदेचे अधिवेशन स्थगित , मोदींची टीका

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधकांच्या प्रचंड गोंधळामुळे संसदेच्या दोन्हीही सभागृहात पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी प्रचंड गोंधळ केला . त्यामुळे अधिवेशन दुपारनंतर दोन्हीही सभागृहांचे कामकाज उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब केले आहे. या गोंधळातच पंतप्रधान मोदींनी मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांचा परिचय करून दिला. दरम्यान संसदेतील गोंधळावरून पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर प्रचंड टीका केली. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले कि, मोठ्या संख्येत दलित, मागासवर्गीय आणि महिलांना मंत्री केल्याने विरोधकांना पटले नाही.
I thought that there would be enthusiasm in the Parliament as so many women, Dalits, tribals have become Ministers. This time our colleagues from agricultural & rural background, OBC community, have been given berth in Council of Ministers: PM introduces his new Ministers, in LS pic.twitter.com/Hf7JIbhFFB
— ANI (@ANI) July 19, 2021
पंतप्रधान म्हणाले कि , दलित बंधू मंत्री झाले आहेत. आदिवासी समाजाचे अनेक सहकारी मंत्री झाले आहेत. सर्वच आनंदी आहेत. शेतकरी कुटुंब आणि ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असलेले, सामाजिक, आर्थिकरित्या मागास वर्गाच्या लोकांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. बाकं वाजवून त्यांचा गौरव केला गेला पाहिजे.
विरोधकांच्या गोंधळावर टीका करताना मोदी म्हणाले कि , देशातील दलित, महिला, ओबीसी आणि शेतकरी पुत्र मंत्री झाले आहेत. ही बाब अनेकांच्या पचनी पडत नाही. यामुळे त्यांचा परिचयही करून दिला जात नाही. महिला, दलितांना, गरीब, शेतकरी आणि मागास समाजाचे नेते मंत्री झाले आहेत. पण विरोधकांना पचनी पडत नाही. त्यांच्या या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांनी मोदींच्या समर्थनात बाकं वाजवत स्वागत केले. दरम्यान लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी विरोधकांनी गदारोळ केला. विरोधकांची मानसिकताही महिलाविरोधी असल्याचा टोला यावेळी पंतप्रधान मोदींनी लगावला.
ओम बिर्ला यांचा संताप
दरम्यान विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना हे संसदेच्या परंपरेला धरुन नसल्याचे सांगत संताप व्यक्त केला. चांगल्या पंरपरा तोडल्या जात आहेत. सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाच्या संसदेत हे वागणे योग्य नाही असं त्यांनी विरोधकांना सुनावले . ओम बिर्ला निधन झालेल्या नेत्यांसाठी शोक प्रस्ताव मांडत असतानाही विरोधक गदारोळ घालत असल्याने ते संतापले.
मोदींचा माध्यमांशी संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशन सुरु होण्याआधी माध्यमांशी संवाद साधला. करोनाविरोधातील लढाईत आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यावेळी त्यांनी लस घेताच करोनाविरोधातील लढाईत आपण बाहुबली बनतो असे सांगत लस घेण्याचं आवाहन केले .
पंतप्रधान म्हणाले कि , “मी आशा करत आहे की तुम्ही सगळ्यांनी लसीचा कमीत कमी एक डोस घेतला असेल. तरीही तुम्ही कोरोनाच्या प्रोटोकॉलचे पालन करा. लस ही हातावर(बाहू) देण्यात येते आणि जेव्हा लस हातावर देण्यात येते तेव्हा तुम्ही बाहुबली बनता. कोरोनाविरुद्धच्या लढाईत जर तुम्हाला बाहुबली बनायचे असेल तर तुम्हाला हातावर लस घ्यावी लागेल. आतापर्यंत ४० कोटी पेक्षा जास्त लोकं करोनाविरुद्धच्या लढाईत बाहुबली बनले आहेत. पुढे ही हे काम जोरात सुरु राहिल.”