MaharashtraPoliticalUpdate : सत्तेत आम्ही एकत्र पण राजकीयदृष्ट्या मी काँग्रेस , राष्ट्वादीच्या विरोधात

मुंबई : राज्यात शिवसेना , काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी सत्तेत असली तरी या तिन्हीही पक्षांचे नेते एकमेकांच्या विरोधात वक्तव्य करीत असल्यामुळे विरोधी पक्षापेक्षा सत्ताधारी महाविकास आघाडीचं पुन्हा चर्चेत आहे. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर सत्ताधारी पक्षात एकच खळबळ उडाली आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सत्तेत आम्ही एकत्र असलो तरी राजकीयदृष्ट्या मी मित्रपक्ष कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात असल्याचे वक्तव्य केल्यामुळे हा वाद अधिकच रंगण्याची चिन्हे आहेत.
महाराष्ट्रातील तीन पक्षांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये ठाकरे यांच्या पक्षाबरोबर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आहे. राजकीयदृष्ट्या मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याविरोधात आहे. मात्र त्याचा असा अर्थ असा नाही की मी त्यांनी सरकारमध्ये केलेल्या चांगल्या कामांची निंदा करेन, नाही. ते चुकीचं ठरेल. मी आणि बाळासाहेबांनी असा कधीच विचार केला नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
Politically, I have been against Congress and NCP (Nationalist Congress Party) but this doesn't mean that I will call out their good work in the Govt, wrong. Neither I nor Balasaheb have thought this: Maharashtra CM Uddhav Thackeray (13.07) pic.twitter.com/zmHRvsInJW
— ANI (@ANI) July 13, 2021
एका कार्यक्रमात स्वबळाच्या नारेबाजीवरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्याच व्यासपीठावरून टोला लगावला. ‘आता जेवणाचा विषय निघाला चांगलं झालं, कोरोनाची भीती बाळगू नका बाळासाहेब, आम्ही सुद्धा स्वबळावर येणार, स्वबळावर म्हणजे आम्ही स्वतः चालत येऊ, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाहत नाना पटोले यांना टोला लगावला आणि सभागृहात एकाच
मुख्यमंत्री पुढे म्हणाले कि , ‘माझी कारकिर्द सर्वांसमोर आहे. विरोधक यांनी जे केलं ते सर्वच वाईट अशी माझी भूमिका कधी नव्हती. पण, या काळात अनेक शोध लागत आहेत, पण पाण्याचा शोध नाही लागला. जे पाणी आहे ते नियोजन महत्त्वाचे आहे. प्रत्येक मंत्र्यांनी जनतेला काही ना काही दिलं पाहिजे, २५ वर्षानंतर महाविकास आघाडीचे नाव लक्षात राहिलं पाहिजे’, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व मंत्र्यांना दिला.