MumbaiNewsUpdate : देवपूजा करताना लुंगीने पेट घेतल्याने सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्याचा मृत्यू

मुंबई : घरात दरवाजा बंद करून देव पूजा करत असताना लुंगीला आग लागल्याने मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त के. नलिनाक्षन यांचा शुक्रवारी पहाटे होरपळून मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. त्यांना त्वरित भायखळा येथील मसीना रुग्णालात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान नलिनाक्षन यांचा मृत्यू झाला. ते ७९ वर्षांचे होते.
नलिनाक्षन हे चर्चगेट येथील ‘ए’ मार्गावरील शर्विले इमारतीत आपल्या कुटुंबासोबत राहत होते. बुधवारी,७ जुलै रोजी नेहमीप्रमाणे ते घरातील देवघरात पूजा करण्यासाठी गेले. दरम्यान दरवाजा लावू बंद घरात पूजा करत असताना, त्यांच्या लुंगीने अचानक पेट घेतला. पूजा करत असताना देवघर आतून बंद असल्याने त्यांच्या मदतीसाठी कोणीही तत्काळ आतमध्ये जाऊ शकले नाही. दरम्यान दरवाजा तोडून त्यांच्या कुटुंबीयांनी आतमध्ये प्रवेश करेपर्यंत नलिनाक्षन ८० ते ९० टक्के भाजले होते. या घटनेनंतर त्यांना तातडीने भायखळा येथील मसीना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . पण याठिकाणी उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
के. नलिनक्षन हे भारतीय सनदी सेवेतील (आयएएस) १९६७ च्या तुकडीचे अधिकारी होते. त्यांनी १९९९-२००१ या कालावधीत ते मुंबई महापालिकेचे आयुक्त होते. त्याचबरोबर त्यांनी अन्य विभागात देखील उच्च पदावर भरीव कामगिरी केली आहे. पूजा करत असताना लुंगीने पेट घेतल्याने त्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.