Viral Video Update : जात विचारून मागास तरुणाला अमानुष मारहाण , व्हायरल व्हिडीओमुळे प्रकरण आले उजेडात

कानपूर : कोणी कितीही नाही म्हटले तरी देशात जातीवरून होणारे शारीरिक आणि मानसिक अत्याचार थांबायला तयार नाहीत. उत्तर प्रदेशात कानपूरच्या ग्रामदिन भागातील एका अनुसूचित जातीच्या तरुणाला त्याची जात विचारून बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडिओमध्ये काही लोक पीडित तरुणाला तरुणाला त्याची जात विचारताना दिसत आहेत. आणि त्या युवकानं आपली जात त्यांना सांगताच त्यांनी त्याला बेदम मारहाण केली जात आहे. आरोपींनी युवकाला प्रचंड मारहाण केली. यासोबतच त्याच्या गुप्तांगावर काठीने हल्ला केला. जखमी अवस्थेत या युवकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे वृत्त असून पोलिसांनी या प्रकरणात एकास अटक केली आहे.
दरम्यान व्हायरल व्हिडिओनंतर या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे , की आरोपी पीडित तरुणाला त्याची जात विचारत आहेत. यानंतर आरोपींनी युवकाला मारहाण करण्यास सुरुवात केली.त्याला काठीनंही अमानुष मारहाण केली गेली. इतकंच नाही तर त्याच्या गुप्तांगावरही वार केल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं. पीडित युवक वेदनंन अक्षरशः ओरडत आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी कानपूर देहातमधील अकबर पुर ठाण्याच्या क्षेत्रातील आहे.
पीटने वाला: "कौन कास्ट हो?"
पिटने वाला: "चमार हैं."फिर डंडों की बौछार बढ़ जाती है।उसे लात, घूसों,डंडों से बेरहमी से पीटा। जिस्म के नाज़ुक हिस्सों में डंडे घुसेड़े।कानपुर देहात में मामला प्रेम प्रसंग का बताते हैं।पुलिस ने एफ़ आई आर कर एक को पकड़ लिया है।दो की तलाश है। pic.twitter.com/BAU4QN2IiZ
— Kamal khan (@kamalkhan_NDTV) July 10, 2021
प्रेमाच्या प्रकरणातून ही मारहाण झाल्याचे म्हटले जात आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सांगितले , की व्हिडिओ व्हायरल झाल्याचे समजताच याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये युवकाला मारहाण करताना दिसणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये आणखी दोन लोक त्याला मारहाण करताना दिसत आहेत. त्यांची ओळख पटवून अटक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी पोलिसांच्या टीम बनवण्यात आल्या आहेत. पीडित युवकाला कानपूरच्या हॅलट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.