IndiaNewsUpdate : बाबोव…!! सेल्फीच्या बहाण्याने नव्या ‘धक्का’दायक नवरीने नवऱ्याला तिसऱ्या मजल्यावरून दिला जोरदार ‘ धक्का’ !!

भोपाळ : मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये एक अजब घटना घडली. नव्यानेच लग्न झालेल्या नवरा- नवरीची हि बातमी आहे. पत्नीच्या सेल्फीच्या हट्टापायी पीडित तरुण तिसऱ्या मजल्यावरील गच्चीवर उभा होता. दरम्यान सेल्फी घेत असतानाच पत्नीने त्याला एक जोरदार धक्का दिला. चुकून लागला असेल म्हणून त्याने पहिल्यांदा लक्षच दिले नाही. त्यावर तिने त्याला पुन्हा धक्का दिला, मग त्याला वाटले कि ती गम्मत करतेय… !! नंतर पत्नीकडून असे धक्के सुरूच होते आणि मग तिने असा धक्का दिला कि , हे पती महाशय थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळले.
दरम्यान या घटनेनंतर तरुणाला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पत्नीच्या पराक्रमामुळे हा तरुण तब्बल १२ दिवस बेशुद्ध होता. शुद्धीत आल्यावर त्याला समजले कि , आपण रुग्णालयात आहोत आणि हि घटना घडल्यानंतर पाचव्याच दिवशी त्याची नवरी त्याला सोडून माहेरी निघून गेली. मग या नवरोबाला सगळं घटनाक्रम आठवला तेंव्हा या ‘फ्लॅशबॅक’ मध्ये त्याला जाणवले कि, पत्नीने जाणीवपूर्वक त्याला ढकलून दिले. या साक्षात्कारानंतर त्याने पत्नीच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलीस त्याच्या या “धक्का”दायक पत्नीचा शोध घेत असून अद्याप ती कुठे आहे, याचा पोलिसांनाही सुगावा लागला नाही.
नेमके काय झाले ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद सैनी, २७ असे जखमी झालेल्या पतीचे नाव आहे. घटनेच्या २० दिवसांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. आई, वडिल आणि छोटा भाऊ यांच्यासह धर्मेंद्र भोपाळमधील प्रोफेसर कॉलनीत राहतो. दरम्यान धर्मेंदची पत्नी सुमनने सेल्फी काढण्याच्या बहाण्याने धर्मेंदला छतावर नेले आणि संधी साधून त्याला खाली ढकलून दिले. याच परिसरात राहणाऱ्या शिवम नावाच्या एका नातेवाईकाने धर्मेंद्र खाली कोसळल्याचे पाहिले आणि त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. धर्मेंद्रला हात, पाय आणि जबडा यांना फ्रॅक्चर असून अंगावर अनेक जखमा आहेत. १२ दिवस बेशुद्ध राहिलेल्या धर्मेंद्रला शुद्ध आल्यानंतर परिस्थितीची जाणीव झाली आणि अशा अवस्थेत पत्नी निघून गेल्याचं समजल्यानंतर त्याचा संशय बळावला. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.