PuneNewsUpdate : अरे रे , हे काय झाले ? डॉक्टर्स डेच्या पूर्वसंध्येला डॉक्टर दाम्पत्याची आत्महत्या !!

पुणे : देशभरामध्ये डॉक्टर्स डे साजरा करीत असताना पुण्यातील वानवडी परिसरात राहणार्या डॉक्टर पती, पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निखिल शेंडकर आणि अंकिता शेंडकर असं आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरांचं नाव आहे. निखिल हे पत्नी अंकितासोबत आझाद नगर वानवाडी येथे राहत होते.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती निखिल आणि पत्नी अंकिता शेंडकर यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले होते. हे दोघेही प्रॅक्टिसिंग डॉक्टर्स होते. काल सायंकाळी निखिल घरी येत असतानाच त्याचा फोनवरुन पत्नी अंकिताशी वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की दोघांनी आरडाओरड केला आणि अखेर अंकिताने फोन ठेवून दिला. मात्र निखिल घरी पोहचला तेव्हा त्याला धक्काच बसला. घरात प्रवेश केल्यानंतर अंकिता ओढणीच्या सहाय्याने छताला लटकलेल्या आवस्थेत निखिलला आढळून आली.
दरम्यान अंकिताने आत्महत्या केल्याने निखिलला मोठा मानसिक धक्का बसला. त्यानंतर त्यानेही ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली मात्र आत्महत्या करण्याइतके टोकाचे पाऊल उचलण्याइतका कोणता मोठा वाद या दोघांमध्ये झाला? ते फोनवरुन क्की कोणत्या कारणावरून भांडत होते, हे अद्याप समजू शकले नाही. वानवडी पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.